prakash ambedkar Karan Gaikar sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Loksabha : 'वंचित'चे नाशिकमध्ये 'मराठा कार्ड', करण गायकर यांना उमेदवारी

Loksabha Election 2024 : वंचितने करण गायकर यांना नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी घोषित केली आहे. मराठा उमेदवार म्हणून करण गायकर या मतदारसंघात चुरस निर्माण करणार का याची उत्सुकता असेल.

Roshan More

Nashik Political News : महायुतीमध्ये नाशिकच्या जागेवरून छगन भुजबळ यांनी माघार घेतली आहे. तर, हेमंत गोडसे हे अजूनही त्यांना उमेदवारी मिळेल म्हणून प्रयत्न करत आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. नाशिक मतदारसंघातून शांतीगिरी महाराज आपला प्रचार करत आहेत. त्यामुळे नाशिकची लढत तिरंगी होणार असल्याचे चित्र असताना वंचितने आपला उमेदवार जाहीर करून ही लढत चौरंगी केली आहे.

वंचितने vanchit करण गायकर यांना नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी घोषित केली आहे. मराठा उमेदवार म्हणून करण गायकर या मतदारसंघात चुरस निर्माण करणार का याची उत्सुकता असेल. कारण उमेदवारी जाहीर करताना वंचितने करण गायकर यांच्या जातीचा उल्लेख केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

छगन भुजबळ Chhagan Bhujbal यांना मनोज जरांगेंच्या आंदोलनानंतर नाशिकमध्ये विरोध होत होता. ते महायुतीचे संभाव्य उमेदवार असतील अशी चर्चा सुरू असताना त्यांच्या विरोधात काही गावांमध्ये मराठा बांधवांनी फलक लावले होते. त्यामुळे या मतदारसंघात वंचितने मराठा उमेदवार घोषित करून वेगळीच खेळी खेळल्याची चर्चा आहे. महायुतीकडून कोण उमेदवार असणार याचीदेखील उत्सुकता असणार आहे.

जळगावमधील उमेदवार बदलला

वंचित बहुजन आघाडीची लोकसभा उमेदवारांची नववी यादी जाहीर झाली असून, यात जळगाव मतदारसंघातून युवराज जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर नाशिकमधून करण गायकर यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. जळगाव मतदारसंघातून याआधी प्रफुल्ल कुमार रायचंद लोढा यांना उमेदवारी घोषित करण्यात आली होती. मात्र, आता त्यांच्या जागी युवराज भीमराव जाधव यांच्या उमेदवारीला मान्यता दिली आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT