Terrible Accident : ठाकरे गटाच्या नेत्याच्या कारला मुंबई-कुर्ला मार्गावर भीषण अपघात!

UBT Group leader Accident News : रायगडमधील प्रचार सभा आटोपून मुंबईच्या दिशेने करत होते प्रवास
Car accident
Car accidentSarkarnama

Mumbai Kurla Road Accident : राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. प्रचारासाठी सर्वपक्षीय नेते मंडळी कंबर कसून कामाला लागली आहेत. त्यामुळे त्यांचे दौरेदेखील वाढले आहेत. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाच्या नेत्याचा कारचा भीषण अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

ठाकरे गटाचे रायगड लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक संजय कदम यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. संजय कदम यांच्या कारला पाठीमागून एका भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. त्यामुळे त्यांच्या कारचे मोठे नुकसानही झाले आहे. परंतु या भीषण अपघातात सुदैवाने कारमधील कोणालाही दुखापत झाली नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Car accident
Parinay Phuke News : डाॅ. परिणय फुकेंच्या गाडीला अपघात, थोडक्यात....

संजय कदम हे रायगडमधील रोहा येथील प्रचार सभा आटोपून मुंबईच्या दिशेने येत होते, तेव्हा हा अपघात घडला. रात्रीच्या सुमारास त्यांच्या कारला मुंबई-कुर्ला मार्गावर एका ट्रकने मागून धडक दिली. ज्यामुळे त्यांच्या कारच्या मागील भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून ट्रकही ताब्यात घेतला आणि पुढील तपास सुरू केला.

या अगोदर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीचाही अपघात झाला होता. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला होता, तर 17 एप्रिलो रोजी मध्यरात्री माजी मंत्री आणि भंडारा- गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या गाडीला भीषण अपघात होणार होता. पण चालकाच्या समयसूचकतेमुळे हा अपघात टळला. मात्र, फुके यांच्या ताफ्यातील एका गाडीचा अपघात झाला होता.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

Car accident
Uddhav Thackeray News : "अमरावतीत थापाड्यांची अन् खोटारड्यांची लंका जाळायला आलोय," ठाकरे राणांवर कडाडले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com