Vandana Patil & Eknath shinde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Congress politics: पदाधिकाऱ्यांतील विसंवादाने नाशिकच्या काँग्रेसला लागली ओहोटी!

Vandana Patil; Congress district President Vandana Patil may join Shivsena Shinde Group-शहर काँग्रेस मधील अनेकांना गळाला लावण्याचे शिवसेना शिंदे पक्षाचे जोरदार प्रयत्न

Sampat Devgire

Eknath Shinde News: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाला गळती लागली आहे. ही गळती थांबविण्यासाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाही. त्यामुळे काँग्रेसची ही ओहोटी रोखणार कोण? अशी चर्चा सुरू आहे.

काँग्रेसचे माजी नगरसेवक जॉय कांबळे यांनी नुकताच शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश केला आहे. त्या पाठोपाठ अन्य एका ज्येष्ठ नगरसेविकेने ही नाराजी व्यक्त केली आहे. आता पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख वंदना पाटील पक्ष सोडणार असल्याचे बोलले जाते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या १४ फेब्रुवारीला नाशिकच्या दौऱ्यावर येत आहे. यावेळी आभार दौऱ्यानिमित्त त्यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेची जोरदार तयारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. या पक्षाचा सर्व भर या सभेत जास्तीत जास्त प्रवेश घडवून आणणे हाच आहे.

या मेळाव्याची चक्क मुंबईहून आलेले पदाधिकारी देखील दारोदारी जाऊन विविध नेत्यांना मधाचे बोट लावत आहेत. त्याचा परिणाम देखील दिसू लागला आहे. काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख वंदना पाटील या शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश करणार असल्याचे कळते.

याबाबत येत्या दोन दिवसात पुढील निर्णय होईल, असे सुचक वक्तव्य त्यांनी केले आहे. त्यामुळे काँग्रेसला हा दुसरा मोठा धक्का मानला जातो. काँग्रेसच्या शहराध्यक्ष तसेच अन्य पदाधिकाऱ्यांमध्ये विसंवाद आहे. पदाधिकाऱ्यांमध्ये परस्परांशी संवाद नसल्याने पक्ष सोडणारे आणि नाराज असणारे यांच्याशी चर्चा देखील होत नसल्याचे बोलले जाते.

काँग्रेस पक्षाच्या उत्तर महाराष्ट्र प्रमुख म्हणून जबाबदारी असलेल्या पदाधिकाऱ्यांनी यावर मौन बाळगले आहे. त्यामुळे नाशिक शहरात आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाला गळती लागली आहे. ही गळती केव्हा आणि कशी थांबणार याची जोरदार चर्चा सुरू आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT