Vasant Gite Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Politics : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसंत गिते मैदानात; भाजपविरोधात रान उठवलं !

सरकारनामा ब्यूरो

Nashik News: आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी पक्ष संघटना मजबूत करण्याच्या अनुषगांने पावलं उचलण्यास सुरवात केली आहे. तसेच नाशिकमध्येही राजकीय वातावरण तापण्यास सुरवात झाली असून अनेक राजकीय नेते आता अॅक्शन मोडवर आले आहेत. माजी आमदार वसंत गिते यांनी मागील पंचवार्षिक निवडणुकीत ब्रेक घेतल्यानंतर आता ते आगामी निवडणुकीत रणशिंग फुंकण्याचा तयारीत आहेत.

वसंत गिते यांनी संघटना बांधणीवर लक्ष केंद्रीत केलं असल्याचं दिसून येत आहे. राज्यात डबल इंजिन सरकारला संधी देण्याचे आवाहन करणाऱ्या भाजपकडे नाशिकच्या महापालिकेचीही सत्ता होती. अशा ट्रिपल इंजिनची सत्ता असूनही सत्ताधाऱ्यांनी काय दिलं?, असा प्रश्न उपस्थित करत वसंत गिते यांनी जोरदार टीका केली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मोर्चेबांधणी करत असताना तीन आमदार निवडण्यात योगदान राहिलेल्या गिते यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक लढवली नाही. मागील पंचवार्षिकमध्ये त्यांनी ब्रेक घेतला. आता त्यांनी पुन्हा एकदा जोरदार तयारी सुरू केली असून नाशिक मध्य मतदारसंघातून त्यांनी रणशिंग फुंकण्याची चर्चा आहे.

गिते सध्या उत्तर महाराष्ट्रात अग्रणी असलेल्या दीड हजार कोटीहून अधिकच्या ठेवी आणि एक लाख 90 हजारांहून अधिक सभासद असलेल्या नामको बँकेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनेत घरवापसी केल्यानंतर ते त्यांच्या वर्षानुवर्षांच्या सहकाऱ्यांसोबत शिवसेनेच्या माध्यमातून सक्रिय आहेत. शहरातील सगळ्या प्रभागांत नव्याने प्रभाग प्रमुखांसह ठाकरे गटाच्या बुथ निहाय बांधणी त्यांनी कंबर कसली आहे. त्यामुळे मध्य विधानसभा मतदारसंघात आतापासूनच चुरस पाहायला मिळत आहे.

महिन्याला विनाकारण चार कोटी रुपये सिटी लिंकला देण्याचा प्रकार भाजपच्या सत्ताकाळात पाहायला मिळाल्याचा आरोप करत परिवहन सेवेच्या बस खासगी संस्थांना देऊन सेवा चालवता आली असती, सामान्य कष्टकरी, हातावर पोट असलेल्या नाशिककरांच्या कर, पाणीपट्टीच्या रुपाने जमा दर महिन्याला कोट्यवधीचा भुर्दंड कुणाच्या खिशात घालत आहे. आयटी पार्कपासून तर अनेक घोषणांचे काय झाले? तसेच मिळकत विभागात आणि टीडीआर प्रकारात 1100 ते 1200 कोटींचा गैरव्यवहार महापालिकेत झाल्याचा आरोप करत भाजपविरोधात गिते यांनी रान उठविले आहे.

निवडणुकीबाबत वसंत गिते काय म्हणाले?

"मध्य मतदारसंघातून तयारी सुरू असून शिवसेना हाच बिनजातीचा पक्ष आहे. या पक्षात सायकलवाला, रिक्षावाला आणि बुरुड गल्लीतील व्यावसायिक लोकप्रतिनिधी झाले. शिवसेनेला जात माहिती नाही. अनेक वर्षे सोबत एकत्र काम करणारे आम्ही सगळे एकजुटीने शहरात काम करत आहोत. कधी कुणाची जात न विचारणाऱ्या आमच्या बिनजातीचा पक्षाला शहरातील मतदार स्वीकारतील", अशी प्रतिक्रिया वसंत गिते यांनी दिली.

Edited By : Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT