Ambadas Danve News : शिवसेनेला दादागिरी शिकवायची नाही, तो आमचा धंदा..

Maharashtra : हीच खरी बाळासाहेबांची शिवसेना, तुम्ही आमची शाखा तोडली, आम्ही तुम्हाला तोडणार.
Opposition Leader Ambadas Danve news, Aurangabad
Opposition Leader Ambadas Danve news, AurangabadSarkarnama
Published on: 
Updated on: 

Shivsena : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत उभारण्यात आलेली चाळीस वर्ष जुनी बांद्रे येथील शिवसेनेची शाखा मिंधे सरकारने पाडली. त्यानंतर तुम्ही एक शाखा पाडली, आम्ही दहा उभारू`, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिला होता. (Ambadas Danve News) त्यातच शिवसेनेची शाखा पाडणाऱ्या अधिकाऱ्याला बहाद्दर शिवसैनिकांनी कार्यालयात घुसून चोप दिला.

Opposition Leader Ambadas Danve news, Aurangabad
Congress Criticize to KCR : तेलंगणचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव सिंघम नव्हे ते तर जयकांत शिक्रे; काँग्रेस प्रवक्त्याची बोचरी टीका!

त्यानंतर अंबादास दानवे यांनी ट्विट करत `ये असलीवाली शिवसेना है`, असा टोला शिंदेसेनेला दिला. (Shivsena) अंबादास दानवे म्हणतात, शिवसेनेला दादागिरी शिकवायची नाही, तो आमचा धंदा आहे', हे वाक्य दादा कोंडके यांनी सांगितले होते. (Marathwada) बोगस कार्यक्रम असल्याचे सांगून एकट्या महिलेला चोप देणारी औलाद आम्ही नाहीत.

आम्ही देतो ती भर बाजारात.. ती पण अशी ! इलाका हमारा, आवाज भी हमारा!! नाम याद रखना 'असली वाली शिवसेना, असे ट्विट करत दानवे यांनी शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा साधला आहे. (Anil Parab) दरम्यान, काल झालेल्या राड्यावर शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनीही स्पष्टीकरण दिले होते. शाखा तोडली त्याच्याविरोधात मी तुमच्याकडे आलेलो नाही.

माझं म्हणणं असं आहे की, शाखेमध्ये महाराजांचा फोटो होता, महाराजांची मूर्ती होती, बाळासाहेबांचा फोटो होता. आमच्या कार्यकर्त्यांनी फोटो काढण्याची मागणी केली. महाराजांच्या आणि बाळासाहेबांच्या फोटोला हात लावण्याची ज्याने हिंमत केली त्याला आम्ही सोडणार नाही! परबांच्या नेतृत्वात काल झालेल्या राड्यानंतर हीच खरी बाळासाहेबांची शिवसेना, तुम्ही आमची शाखा तोडली, आम्ही तुम्हाला तोडणार, अशा प्रतिक्रिया समाज माध्यमांवरून उमटायला लागल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.