Vasant Gite News: आगामी महापालिका निवडणुकीबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे संकेत दिले आहेत. नाशिकमध्ये मात्र शिवसेना आणि मनसेने स्वबळाची तयारी सुरू केली आहे. पक्षाकडे सर्वाधिक सक्षम उमेदवार असल्याचा दावा नेत्यांनी केला आहे.
राज्यात मुंबई, पुणे, ठाणे आणि नाशिक शहरात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा मतदार मोठ्या संख्येने आहे. आजवरच्या विविध निवडणुकांच्या निकालातून याची प्रचिती आली आहे. त्या दृष्टीने नाशिक महापालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरू आहे.
शिवसेना ठाकरे पक्षाचे विविध नगरसेवक भाजप आणि शिंदे पक्षात गेले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते माजी आमदार वसंत गीते यांनी, गद्दार पक्ष सोडून गेले तरीही मतदार मात्र शिवसेना ठाकरे पक्षा सोबतच आहेत, असा दावा केला आहे. नाशिककर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूंनाच आगामी निवडणुकीत पसंती देतील, असा दावाही त्यांनी केला.
शिवसेना ठाकरे पक्षाकडे सध्या बोटावर मोजण्या एवढेच नगरसेवक राहिले आहेत. पार्श्वभूमीवर माजी आमदार गीते यांनी, नगरसेवक सोडून गेल्याने फारसा फरक पडणार नाही. शिवसेना आणि मनसे कडे सर्व १२२ जागांसाठी सक्षम उमेदवार आहेत. उमेदवारी देण्यासाठी पक्षात स्पर्धा आहे, असा दावा केला.
सध्या विरोधी पक्ष जो येईल त्याला पक्षात प्रवेश देत आहे. अनेक वादग्रस्त आणि गुन्हेगारांनाही सत्ताधारी पक्षाकडून प्रवेश दिला जात आहेत. शहरातील जनता गुन्हेगारीने त्रस्त आहे. अशा स्थितीत सत्ताधारी पक्षाचे हे धोरण नाशिक शहराला संकटात नेईल. मतदार या गुन्हेगारीला विटले असल्याने निवडणुकीत ते नक्कीच धडा शिकवतील.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या प्रयत्नातून नाशिकचे अनेक मूलभूत प्रश्न सुटले आहेत. सत्तेत असताना यापूर्वी शहराच्या पिण्याच्या पाण्यापासून तर मूलभूत सुविधा आणि सुशोभीकरणाचे अनेक प्रकल्प उभारण्यात आले. भाजप सत्तेत आल्यावर त्यांना ते प्रकल्प सांभाळता आले नाही, असा दावा माजी आमदार गीते यांनी केला.
गेल्या वर्षभर दोन्ही पक्ष आणि पक्षाचे कार्यकर्ते एक दिल्याने काम करीत आहेत. महापालिका निवडणुकीच्या तयारीत कोणतीही कमतरता राहिलेली नाही. पक्षाने नियोजनबद्ध पद्धतीने प्रत्येक प्रभागात एकापेक्षा अधिक उमेदवार तयार केले आहेत. त्यामुळे उमेदवारी देताना शिवसेना आणि मनसेकडे सर्वाधिक स्पर्धा असेल असा दावाही त्यांनी केला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोनच दिवसांपूर्वी पुणे येथे महाविकास आघाडीचा पर्याय खुला असल्याचे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये मात्र शिवसेना नेते स्वबळावर निवडणुकीची तयारी करीत आहे. त्यामुळे शिवसेना, मनसे नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाबाबत काय धोरण स्वीकारणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.