Girish Mahajan Politics: बदल्यांच्याआडून गिरीश महाजन यांचा नाशिकच्या मंत्र्यांना पुन्हा संदेश, 'आता पालक मंत्री पद विसरा?'

Girish Mahajan selected his team, appointed officers for the Kumbh Mela, senior officers transfers in Nashik-मंत्री गिरीश महाजन यांनी आगामी सिंहस्थ सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी बनवली आपल्या ‘खास’ अधिकाऱ्यांची टीम!
Girish-Mahajan
Girish-MahajanSarkarnama
Published on
Updated on

Kumbh Mela News: नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा वाद आणि निर्णय दोन्हीही राजकीय वादात सापडले आहे. शिक्षण मंत्री दादा भुसे आणि ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ पालकमंत्री पदासाठी इच्छुक आहेत, हे लपून राहिलेले नाही. मात्र कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी या मंत्र्यांवर मात केली आहे.

राज्य शासनाच्या दृष्टीने २०२७ मध्ये होणारा नाशिकचा कुंभमेळा हा सर्वात मोठा उत्सव आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यात विशेष लक्ष घातले आहे. त्यासाठी सुमारे पंधरा कोटींचा आराखडा नियोजनात आहे. त्या दृष्टीने महायुतीतील सर्वच पक्षांना नाशिकचे पालकमंत्री पद आपल्याकडे हवे आहे.

या पार्श्वभूमीवर काल नाशिकमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची मोठी खांदेपालट मंगळवारी झाली. जिल्हाधिकारीपदी आयुष प्रसाद यांची नियुक्ती झाली. जिल्हाधिकारी जलद शर्मा यांची नाशिक महानगर प्राधिकरण येथे तर पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांची कुंभमेळा आयुक्तपदी नियुक्ती झाली. महापालिका आयुक्तपदी मनीषा खत्री कायम आहेत.

Girish-Mahajan
Nashik Crime: धक्कादायक; रामदास आठवलेंचा निकटवर्तीय भूषण लोंढेचा व्हिडिओ, "मेरे कहने पे दिन और रात"

हे सर्व अधिकारी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या मर्जीतले मानले जातात. कुंभमेळा तोंडावर असताना मोठ्या प्रमाणावर झालेल्या या बदल्या सहकारी पक्षांसाठीही धक्कादायक ठरल्या आहेत. त्यामुळे सध्या नाशिकच्या अधिकाऱ्यात झालेली खांदेपालट राजकीय चर्चेचा विषय बनली आहे.

Girish-Mahajan
North Maharashtra: हातातोंडाशी आलेला घास हिरावला! उत्तर महाराष्ट्रात पिकांना तडाखा

नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा गेल्या सहा महिन्यांपासून लटकलेला आहे. गिरीश महाजन यांची पालकमंत्री पदी नियुक्ती झाली होती. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या हस्तक्षेपामुळे चोविस तासांत ती स्थगित करण्यात आली.

शिक्षण मंत्री दादा भुसे यांना पालकमंत्री पदाची आस आहे. ज्येष्ठ मंत्री म्हणून छगन भुजबळ यांनाही नाशिकच्या पालकमंत्री पदात रस होता. दोन्ही मंत्र्यांनी या संदर्भात जाहीरपणे आपली इच्छा व्यक्त केली होती. तीन दिवसांपूर्वी मंत्री भुसे यांनी तर ‘नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा विषय डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे न्यावा लागेल’ असे गमतीदार विधान केले होते.

पालकमंत्रीपदाचा हा प्रश्न अद्यापही लटकलेलाच आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री आपल्या पक्षाचा होईल, याची प्रतीक्षा करीत होते. मात्र सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आपल्या मर्जीतली टीम तयार करून कुंभमेळा मंत्री महाजन यांनी या नेत्यांवर मात केली आहे.

जिल्ह्यातील चारही मंत्र्यांना आता सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनात किती हस्तक्षेप करता येईल, हा प्रश्नच आहे. वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांतून तसा संदेश मंत्री महाजन यांनी दिला आहे. त्यामुळे भाजप वगळता महायुतीच्या अन्य नेत्यांना मूकदर्शक होण्या पलिकडे फारसे काही शिल्लक नाही.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com