Vasantdada Sugar Factory sargar
उत्तर महाराष्ट्र

Nashik Politics : आमदार डॉ. राहुल आहेर यांच्यापुढे राजकीय पेच; वसंतदादा कारखाना दुसऱ्यांदा विक्रीला!

Vasantdada Sugar Factory Rahul Aher : वसंतदादा साखर कारखाना गेल्या नऊ वर्षांपासून शेवटच्या घटका मोजत आहे. अनेक बँकांच्या कर्जाच्या ओझाने हा कारखाना धाराशाही झाला. आता राजकीय वादात दुसऱ्यांदा तो विक्रीला काढण्यात आला आहे.

Sampat Devgire

Vasantdada Sugar Factory News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वसंतदादा सहकारी साखर कारखाना (वसाका) मदत करू, असे नऊ वर्षांपूर्वी आश्वासन दिले होते. भाजपचे आमदार डॉ राहुल आहेर यांनी याबाबत पुढाकार घेतला होता. मात्र नेत्यांची भाऊगर्दी आणि राजकारणाची बजबजपुरी यात तो अडकला.

भाजपाचे आमदार डॉ राहुल आहेर यांच्या मतदारसंघातील हा कारखाना आहे. राजकीय नेत्यांच्या आणि गटांच्या संघर्षातून तो बाहेर पडू शकला नाही. कारभार हकणाऱ्यांमुळेच हा कारखाना भ्रष्टाचाराच्या गाळात रुतला, असा आरोप शेतकरी संघटनेचे नेते कुबेर जाधव यांनी केला आहे.

शिखर बँकेसह नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक, एचडीएफसी बँक, बँक ऑफ इंडिया आणि राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ अशा अनेक संस्थांच्या कर्जाची प्रदीर्घ थकबाकी या कारखान्यावर आहे . यासंदर्भात डीआरटी या संस्थेने राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाचा पहिला दावा मान्य करून कारखान्याच्या लिलावाची नोटीस प्रसिद्ध केली आहे.

७७ एकर जमीन असलेल्या कारखान्याचे मूल्यांकन पंचवीस कोटी तर १७ मेगा व्हॅट ऊर्जा निर्मिती प्रकल्पाचे मूल्यांकन 66 कोटी रुपये दाखविण्यात आले आहे. याबाबत ऑनलाइन बोली लावण्यासाठी 19 नोव्हेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. मात्र यापूर्वीही या कारखान्याची विक्री करण्याचा निर्णय झाला होता. नोटीस प्रसिद्ध झाली मात्र विक्री होऊ शकली नाही.

या कारखान्याने शिखर बँक आणि त्यानंतर जिल्हा बँकेचेही कर्ज घेतले आहे. जिल्हा बँक आर्थिक अडचणीत असताना वसुली रखडली आहे. अशातच दुसऱ्यांदा विक्रीची नोटीस निघाली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेचे कर्ज वसूल व्हावे, यासाठी या नोटीसला हरकत घेण्यात येईल, असे बँकेचे प्रशासक संतोष बिडवाईक यांनी सांगितले.

हा कारखाना राजकीय नेत्यांचा आरोप प्रत्यारोपानी सातत्याने चर्चेत राहिला आहे. माजी आरोग्य मंत्री डॉ डी. एस.आहेर या कारखान्याचे अध्यक्ष राहिले आहेत. त्यानंतर डॉ जे. डी. पवार हे अध्यक्ष होते. ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारताना डॉ. पवार यांनी आर्थिक व व्यवहार्यता याकडे दुर्लक्ष केल्याने कारखाना संकटात गेला असा आरोप होत आहे.

कामगारांची आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे देणे अद्यापही प्रलंबित आहे. या स्थितीत कारखान्याची विक्री अशक्य आहे. नव्याने भाग भांडवल उभारून हा कारखाना सुरू करणे हाच यावर पर्याय असल्याचे कामगार आणि शेतकरी संघटनेचे नेते कुबेर जाधव यांनी सांगितले. आमदार डॉ. आहेर यांची प्रतिक्रिया मात्र समजू शकली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT