

रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरे गटाचे जितेंद्र चव्हाण यांनी शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांची भेट घेतल्यानंतर पक्षात मोठा वाद निर्माण झाला.
ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी तत्काळ कारवाई करत जितेंद्र चव्हाण यांची पक्षातून हकालपट्टी केली.
या घटनेमुळे ठाकरे गटात असंतोष वाढला असून रत्नागिरीतील राजकीय समीकरणात बदल होण्याची शक्यता आहे.
Ratnagiri News : राज्यात एकीकडे आगामी नगरपालिका आणि नगरपरिषदा यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. यामुळे महायुतीसह महाविकास आघाडीत मोर्चे बांधणीला वेग आला आहे. अशातच कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मोठी कारवाई केली असून चिपळूणच्या उपतालुका प्रमुखावर हकालपट्टीची कारवाई केली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून पक्षाचे एकमेव आमदार भास्कर जाधव यांनाच धक्का बसल्याचे येथे बोलले जात आहे. यावरून आमदार जाधव यांनी, जितेंद्र उर्फ पप्या चव्हाण यांना कार्यकर्त्यांनी विरोध केला असतानाही आपला जुना सहकारी म्हणून प्रेमापोटी तालुकाप्रमुखपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती. मात्र त्यांनी विश्वासघात केला, यामुळेच त्यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली आहे.
राज्यात सध्या आगामी स्थानिकच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. नगरपालिका आणि नगरपरिषदा यांच्या निवडणुकींसाठी तारखा देखील जाहीर झाल्या असून राजकीय पक्षांसह इच्छुकांकडून कंबर कसण्यात आली आहे. अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोकणातील एकमेव आमदार भास्कर जाधव यांचा अत्यंत जवळचा आणि विश्वासू मानल्या जाणाऱ्या सहकाऱ्यानेच विश्वास घात केला आहे.
जितेंद्र चव्हाण यांनी उदय सामंत यांची भेट घेतल्याचे समोर आले आहे. ही भेट आमदार भास्कर जाधव यांच्या जिव्हारी लागली असून त्यांनी यावर भाष्य देखील केलं आहे. यानंतर पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत भास्कर जाधव यांनी जितेंद्र चव्हाण यांची शिवसेनेतून हकालपट्टी केलीय. दरम्यान रामपूर जिल्हा परिषद गटातून उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज जितेंद्र चव्हाण यांनी उदय सामंत यांची भेट घेतल्याची होती चर्चा आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे नेते तथा आमदार भास्कर जाधव यांच्या अत्यंत जवळचा सहकारी जितेंद्र चव्हाण यांनी मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. यावरून पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत भास्कर जाधव यांच्याकडून जितेंद्र चव्हाण यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाचे नेते भास्कर जाधव यांना आणखी एक धक्का बसल्याचे बोलले जात आहे.जितेंद्र चव्हाण हे चिपळूणचे उपतालुका प्रमुख होते.
यावेळी जितेंद्र चव्हाण यांची नेमणूक करतानाच 72 गावातील अनेक कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. मात्र आपला जुना सहकारी म्हणून प्रेमापोटी पप्या चव्हाण यांच्यावर तालुकाप्रमुखपदाची जबाबदारी सोपवली होती. अखेर त्यांनी विश्वासघात केला. यामुळेच त्यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे आमदार जाधव यांनी सांगितले.
तसेच आमदार भास्कर जाधव म्हणाले की, अनेकदा समज देऊनही त्यांनी पक्षविरोधी कारवाया थांबवल्या नाहीत. ही बाब पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवली असून त्यांच्या आदेशाने चव्हाण यांची पक्षातून हकालपट्टी केलीय. जितेंद्र उर्फ पप्या चव्हाण यांच्याकडून गुहागर मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून वारंवार पक्षविरोधी कारवाया सुरू होत्या. विरोधी पक्षाशी हातमिळवणी, बैठका ही त्यांची कायमची सवय असून वारंवार त्यांना समज देऊनही त्यांच्यात सुधारणा झाली नाही, असे आमदार जाधव यांनी सांगितले
1. रत्नागिरीत कोणत्या नेत्याची पक्षातून हकालपट्टी झाली?
शिवसेना ठाकरे गटाचे चिपळूण तालुका उपप्रमुख जितेंद्र चव्हाण यांची हकालपट्टी झाली.
2. त्यांनी कोणाची भेट घेतली होती?
त्यांनी उद्योगमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांची भेट घेतली होती.
3. हकालपट्टीची कारवाई कोणी केली?
ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी त्यांच्यावर कारवाई केली.
4. भेटीमागील कारण काय होते?
भेटीचे अधिकृत कारण स्पष्ट नसले तरी राजकीय समीकरणांच्या दृष्टीने ती महत्त्वाची मानली जाते.
5. या घटनेचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
या घटनेमुळे ठाकरे आणि शिंदे गटातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.