Minister Atul Save
Minister Atul Save Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Co-operative News; `वसाका` अवसायकांचा विषय आता सहकारमंत्र्यांच्या कोर्टात!

Sampat Devgire

कळवण : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील देवळा, कळवण, सटाणा, मालेगाव तालुक्यांचे कार्यक्षेत्र व प्रमुख अर्थकारण असलेल्या वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्यावर (Vasantdada Sugar) नियुक्त अवसायक (auctioner) यांची नियुक्ती सहकार कायद्यातील (Co-operative) तरतुदीनुसार बेकायदेशीर असल्याने कारखाना हा अवसायक कार्यमुक्त करावा अशी मागणी वसाका बचाव परिषदेचे निमंत्रक सुनील देवरे (Sunil Devre) यांनी केली. याबाबत राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे (Atul Save) यांची भेट घेऊन या प्रकरणी सविस्तर निवेदन त्यांना दिले. (Cooperative minister will take cognizance on auctioner appointment)

वसंतदादा पाटील सह.साखर कारखाना थकीत कर्ज वसुली करिता राज्य सहकारी बँकेने महाराष्ट्र सरफेशी कायदानुसार कारखाना मालमत्ता जप्त केली आहे. बँकेने कारखाना केवळ जप्त केला असून ही बँकेची अंतिम मालमत्ता नाही. कारखाना बँकेने परस्पर मे. धाराशिव साखर उद्योग यांना अत्यल्प वार्षिक भाडे तत्त्वावर, प्रदीर्घ काळाकरिता दिलेला आहे.

हा करारच अव्यवहार्य असताना, अवसायक ही संकल्पना ऐवजी प्रशासक किंवा प्राधिकृत मंडळ नियुक्त होणे आवश्यक आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलमान्वये संचालक मंडळातील दोष निर्माण झाला असेल, तर संस्थेचे कामकाज करिता प्राधिकृत मंडळ नियुक्तीची तरतूद असल्याने निर्णय अपेक्षित असल्याचे श्री.देवरे यांनी लक्षात आणून दिले.

कारखाना सुरू असताना झालेली किमान ५ लक्ष मेट्रिक टन गाळप होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असून, पुढील कार्यकाळात हे उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी धाराशिव साखर उद्योग, उस्मानाबाद यांची हमी घ्यावी. हमी देणार नसेल, तर भाडे करार रद्द करावा, २६ हजार कारखाना सभासदांचे सभासदत्व पुन्हा पुनर्स्थापित करावे अशी मागणी या वेळी श्री. देवरे यांनी केली.

चौकशीचा आदेश धाब्यावर

वसंतदादा पाटील सह.साखर कारखान्यावर नियुक्त अवसायक कार्यमुक्त करण्यासह कारखाना कामकाज व व्यक्तिशः जबाबदारी निश्चित करणारी कायदा/ कलम ८८ खालील चौकशी कामकाजाची प्रगती अहवाल सादर करावा तसेच सभासद हक्क पुनर्स्थापित होण्यासाठी सुनावणी घेण्याबाबत सहकार आयुक्त (पुणे) यांनी २८ जानेवारी २०२२ रोजी निर्देश दिले होते. परंतु आयुक्त यांनी दिलेले आदेश धाब्यावर बसवत कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे सांगून सदरचा पत्रव्यवहार सहकार मंत्री सावे यांना सादर करून कार्यवाही करावी अशी मागणी केली.

सहकार मंत्री घेणार बैठक

कारखान्याच्या समस्याप्रश्‍नी सहकारमंत्री लवकरच बैठक घेणार असून या बैठकीसाठी राज्य सहकारी बँक, सहकार आयुक्त, साखर आयुक्त, कारखाना प्रतिनिधी,कामगार प्रतिनिधी,लोकप्रतिनिधी, व संबंधितांची बैठक होणार असून, बैठकीसाठी पालकमंत्री दादासाहेब भुसे, आमदार डॉ.राहुल आहेर, नितीन पवार, कारखाना अध्यक्ष अभिजित पाटील, बचाव परिषदेचे सुनील देवरे, विविध पक्षांचे व शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी पंडितराव निकम, प्रभाकर पाटील, सुधाकर पगार, जितेंद्र पगार, देविदास पवार, दिनकर जाधव, आनंद देवरे, मोठाभाऊ देवरे, यांचेसह कार्यक्षेत्रातील जबाबदार व्यक्तींना उपस्थिती बाबत निमंत्रित करणार असल्याचे सुनील देवरे यांनी स्पष्ट केले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT