Vijay Chaudhary Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Vijay Chaudhary : PA नंतर आता विजय चौधरींच्या मुलालाही पोलिसांनी उचललं ; नंदुरबारच्या राजकारणात खळबळ

Mandar Chaudhary was detained by Nandurbar Police : कथित व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणाला धक्कादायक वळण मिळालं आहे. विजय चौधरींच्या मुलालाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.

Ganesh Sonawane

Vijay Chaudhary Audio Clip : भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या कथित व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणाला धक्कादायक वळण मिळालं आहे. याप्रकरणात नंदुरबार पोलिसांनी विजय चौधरी यांच्या मुलाला चौकशीसाठी पुण्यातून ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे नंदुरबारच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

नंदुरबार पोलिसांनी पुण्यातील वाकड भागातून विजय चौधरी यांच्या मुलाला ताब्यात घेतलं. मंदार चौधरी असे त्यांच्या मुलाचे नाव असून चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती जिल्हापोलिस अधिक्षकांनी दिली.

विजय चौधरी यांच्या विविध मंत्र्यांसोबत, भाजपच्या पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत महिला नेत्यासंबंधी अर्वाच्च भाषेतील कथित संभाषणाच्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. या ऑडिओ क्लिपची संख्या काही हजारांमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. त्यात मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत बोलतानाची एक कथित क्लीपही व्हायरल झाली होती. ज्यात चौधरी यांनी आमदार एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे व मुलगी रोहिणी खडसे यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषेत वक्तव्य केल्याचा आरोप आहे.

दरम्यान, चौधरी यांच्यावर नंदुरबार शहर पोलिसांत माजी खासदार हिना गावित यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपातून अॅट्रॉसिटी व इतर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विजय चौधरी यांनी यासर्व क्लीप बनावट असून AI च्या माध्यमातून छेडछाड करुन बनवण्यात आल्याचा दावा केला आहे. त्यांनी भाजप उत्तर महाराष्ट्र संयोजक पदाचा राजीनामा देखील दिला आहे. याप्रकरणी चौधरी यांचे पुत्र मंदार यांनी नंदुरबार पोलिसांत अधिकृतपणे फिर्याद दिली होती. त्यात त्यांनी विजय चौधरी यांच्या मोबाइलमधील डाटाची छेडछाड करून संशयिताने डाटा आणि ऑडिओ क्लिप व्हायरल केल्याचे म्हटले होते. त्यानुसार, पोलिसांकडून तपास सुरू होता.

दरम्यान तपास सुरु असताना पोलिसांनी चार दिवसांपूर्वी चौधरी यांचा खासगी पीए आणि सोशल मीडिया हँडलर यश टिपरे याला पुण्यातून ताब्यात घेतलं होतं. चौधरी यांच्या मोबाईलमधून त्यानेच या क्लीप व्हायरल केल्याचा पोलिसांना संशय आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

दरम्यान चौधरी यांचा पीए यश टिपरे व मंदार चौधरी या दोघांमध्ये काही कारणास्तव वाद झाला होता. त्यावरुन टिपरे याने नोकरी सोडली होती, अशी माहिती पुढे येत आहे. त्यातूनच पोलिसांनी चौकशीसाठी यश टिपरे याला ताब्यात घेतलं होतं. आता पोलिसांनी मंदार यांनाही चौकशीसाठी पुण्यातून ताब्यात घेतले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT