Vijay Chaudhary : भाजपचा राजीनामा द्यावा लागला, विजय चौधरींच्या कथित व्हायरल ऑडिओ प्रकरणात मोठा ट्विस्ट, पोलिसांनी थेट खाजगी PA'ला उचललं...

Vijay Chaudhary Audio Leak, PA arrested : ऑडिओ क्लिप व्हायरल करणारा विजय चौधरी यांचा खासगी स्वीय सहायक (PA) निघाला आहे. त्याला आता पुण्यातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Vijay Chaudhary : भाजपचा राजीनामा द्यावा लागला, विजय चौधरींच्या कथित व्हायरल ऑडिओ प्रकरणात मोठा ट्विस्ट, पोलिसांनी थेट खाजगी PA'ला उचललं...
Published on
Updated on

Maharashtra politics : भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्यातील कथित व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. यातून भाजपमधील अंतर्गत गटबाजी देखील चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळालं.

या कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर चौधरी यांनी उत्तर महाराष्ट्र संयोजक पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. राजीनामा देताना चौधरी यांनी व्हायरल क्लीप बनावट असून हे विरोधकांनी षड्यंत्र रचल्याचा आरोप केला.

दरम्यान, या प्रकरणी धक्कादायक माहिती पुढे आली असून चौधरी यांच्या खासगी सचिवानेच ही क्लिप लीक केल्याचं प्राथमिक तपासातून निष्पन्न झालं आहे. चौधरी यांचा खासगी पीए आणि सोशल मीडिया हँडलर यश टिपरे याला पोलिसांनी पुण्यातून अटक केली असून न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Vijay Chaudhary : भाजपचा राजीनामा द्यावा लागला, विजय चौधरींच्या कथित व्हायरल ऑडिओ प्रकरणात मोठा ट्विस्ट, पोलिसांनी थेट खाजगी PA'ला उचललं...
BJP Leader: बड्या नेत्यानं तडकाफडकी भाजपला सोडलं अन् मोदींचाच मागितला राजीनामा, काय आहे कारण?

चौधरी यांच्या पीएने स्वतःच्या मर्जीने या क्लीप व्हायरल केल्या की, यामागे पक्षातील किंवा बाहेरील काही मोठ्या राजकीय व्यक्तींचा हात आहे? या व्यतिरिक्त आणखी काही नेत्यांच्या क्लिप्स लीक झाल्या आहेत का, याचा शोध घेतला जात आहे. संशयित टिपरे हा बुलढाणा जिल्ह्यातील असल्याने या प्रकरणाचे बुलढाणा कनेक्शन समोर आले आहे.

विजय चौधरी यांच्या गेल्या काही दिवसांत अनेक कथित ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्या. विजय चौधरी यांचे विविध मंत्र्यांसोबत, भाजपच्या पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत महिला नेत्यासंबंधी अर्वाच्च भाषेतील कथित संभाषणाच्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्यांनी भाजपच्या पदाचा राजीनामा दिला.

Vijay Chaudhary : भाजपचा राजीनामा द्यावा लागला, विजय चौधरींच्या कथित व्हायरल ऑडिओ प्रकरणात मोठा ट्विस्ट, पोलिसांनी थेट खाजगी PA'ला उचललं...
Nashik Politics : युरियाच्या काळाबाजाराने गाठलं राजकारण! माजी जिल्हा परिषद सदस्याच्या सहभागाने नाशिकमध्ये खळबळ, दोघांना अटक

या दरम्यान त्यांचे पुत्र मंदार यांनी याप्रकरणी आठ दिवसांपूर्वी नंदुरबार पोलिसांत अधिकृतपणे फिर्याद नोंदवली होती. त्यात त्यांनी विजय चौधरी यांच्या मोबाइलमधील डाटाची छेडछाड करून संशयिताने डाटा आणि ऑडिओ क्लिप व्हायरल केल्याचे म्हटले होते. त्यानुसार, पोलिसांकडून तपास सुरू होता. विजय चौधरी यांचे विविध मंत्र्यांसोबत, भाजपच्या पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबतचे कथित संभाषणाच्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. त्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

चौधरी यांच्यावर नंदुरबार शहर पोलिसांत माजी खासदार हिना गावित यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपातून अॅट्रॉसिटी व इतर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौधरी यांनी मात्र, आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत. एआय तंत्रज्ञानाचा वापर करुन ऑडिओ बनवून त्या व्हायरल करण्यात आल्याचं चौधरी याचं म्हणणं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Heena Gavit
Dhairyasheel Mohite Patil-jaykumar Gore
Anil Patil ON Shirish Chaudhari  news
Dhairyasheel Mohite-Patil
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com