Vijay Wadettiwar-Manikrao Kokate  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Vijay Wadettiwar On Manikrao Kokate : माणिकरावांचा शेतकऱ्यांना उलट सवाल, वडेट्टीवार म्हणाले त्यांना मस्ती आली आहे...

Manikrao Kokate news : सरकारला व कृषीमंत्र्यांना सत्तेची मस्ती आली आहे. हे सरकार संवेदन शुन्य सरकार आहे. या सरकारच्या संवेदना संपल्या आहेत. अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

Ganesh Sonawane

Maharashtra politics : अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. अवकाळी व गारपीटमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या मुद्यावरुन उलट सवाल करत नको ते सुनावलं आहे.

यावरुन शेतकऱ्यांना घेऊन सरकार गंभीर नाही, शेतकरी संकटात असताना कृषीमंत्री सत्तेच्या मस्तीत आहे, अशी टीका कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ते म्हणाले, राज्याच्या कृषी मंत्र्यांची जबाबदारी फार मोठी असते. राज्यातील शेतकरी संकटात आहे. विदर्भ, मराठवाड्यात फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. नाशिकमध्ये कांदा, डाळिंब बागांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे हातात आलेले पीक हातातून निसटत असताना कृषीमंत्री म्हणून माणिकरावांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावून त्यांना आश्वस्त करणं गरजेचं होतं.

पण, सरकारला व कृषीमंत्र्यांना सत्तेची मस्ती आली आहे. हे सरकार संवेदन शुन्य सरकार आहे. या सरकारच्या संवेदना संपल्या आहेत. अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

कृषीमंत्री नक्की काय म्हणाले होते?

नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल का म्हणून शेतकऱ्यांनी विचारलं असता माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांनाच उलट सवाल करत खडे बोल सुनावले. कोकाटे म्हणाले, कर्जमाफी मिळाल्यानंतर त्या पैशांचे तुम्ही काय करता? शेतीमध्ये गुंतवणूक करता का? असा सवाल कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना केला.

शेतकरी पाच ते दहा वर्ष वाट बघतात, तोपर्यंत कर्ज भरतच नाहीत. सरकार तुम्हाला शेतीत गुंतवणूक करण्यासाठी पैसे देणार आहे. ते पाईपलाईन, सिंचन आणि शेततळ्यासाठी पैसे आहेत. सरकार भांडवली गुंतवणूक करतं. अशी गुंतवणूक शेतकरी करतात का? शेतकरी म्हणतात, पीक विम्याचे पैसे पाहिजेत. मग त्यातून साखरपुडे करा, लग्न करा, असंही मंत्री कोकाटे यांनी म्हटलं.

शेतकरी बसले ताटकळत

नाशिकच्या विविध तालुक्यांत अवकाळी पाऊस व गारपीटमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी काल (दि.4) नाशिक मधील अवकाळीग्रस्त भागाचा दौरा केला. मात्र, पक्षाच्या बैठकीला उशीर झाल्याने त्यांना अवकाळी भागाचा दौरा करण्यासाठी उशीर झाला. तोपर्यंत शेतकरी ताटकळत त्यांची वाट पाहत होते.

बळीराज्याच्या जीवावर दोन वेळचं...

कृषीमंत्री यांच्या याच विधानावर महायुती सरकारमधील शिंदे शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांना विचारले असता, ते म्हणाले कृषीमंत्र्यांनी नक्की काय वक्तव्य केलं माहित नाही. पण, शेतकरी सरकारमधील महत्वाचा घटक आहे. बळीराजाच्या जीवावर दोन वेळचं आपण जेवतो याची जाणीव असल्याने शेतकऱ्याचा सन्मान राखणं महायुती सरकारचं कर्तव्य आहे. असे सामंत म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT