Tanisha Bhise Death Case : दीनानाथ रुग्णालयातील प्रकरणानंतर धर्मादाय आयुक्त अ‍ॅक्शन मोडवर! घेतला 'हा' मोठा निर्णय

Pregnant woman death Pune : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. तनिषा भिसे या गर्भवती महिलेवर उपचार करण्याआधी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने भिसे यांच्या कुटंबियांकडे दहा लाखांची मागणी केल्याचा आरोप केला जात आहे.
Deenanath Mangeshkar Hospital
Deenanath Mangeshkar HospitalSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 05 Apr : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. तनिषा भिसे या गर्भवती महिलेवर उपचार करण्याआधी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने भिसे यांच्या कुटंबियांकडे दहा लाखांची मागणी केली. तर वेळेत पैसे जमा न झाल्याने महिलेवर उपचार करण्यास उशीर झाला.

तर वेळेत उपचार न मिळाल्यामुळेच तनिषा भिसे यांचा प्रसुतीनंतर मृत्यू झाल्याचा आरोप आता केला जात आहे. या घटनेमुळे राज्यभरातून दीनानाथ रुग्णालयावर संताप व्यक्त केला जात आहे. अशातच दीनानाथ रुग्णालयात झालेल्या या गंभीर प्रकरणाची गंभीर दखल धर्मादाय आयुक्तांनी घेतल्याचं दिसत आहे.

कारण आता या प्रकरणानंतर धर्मादाय आयुक्तांनी कठोर निर्णय घ्यायला सुरूवात केली आहे. त्यानुसार राज्यभरातील सर्व धर्मादाय रुग्णालयांना नियम आणि अटी पाळण्याच्या आणि त्या नियमांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिवाय जुन्याच नियमांखाली राज्यातील धर्मादाय रुग्णालय सुरू आहेत, याचा फेर विचार करावा, अशी मागणी देखील धर्मादाय आयुक्तालयाकडून केली जात आहे.

Deenanath Mangeshkar Hospital
Manikrao Kokate : कर्जमाफी मिळणार का? शेतकऱ्याच्या प्रश्नावर कृषीमंत्री संतापले, म्हणाले, "त्या पैशातून साखरपुडे, लग्न..."

पुण्यातील (Pune) दीनानाथ रुग्णालयातील प्रकरणानंतर धर्मादाय आयुक्त कार्यालयातर्फे चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश देण्यात आलेत. त्यानंतर धर्मादाय रुग्णालयातील नियम कठोर करण्यासाठी आयुक्तांनी निर्देश दिले आहेत.

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तयार करण्यात आलेला धर्मदाय रुग्ण योजनेची सर्व रुग्णालयाकडून प्रभावी अंमलबजावणी करणं, तसंच या रुग्णालयातील आरक्षित खाटा निर्धन आणि दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्याच्या सुचना आता देण्यात आल्या आहेत.

Deenanath Mangeshkar Hospital
Beed Jail Gang War Update : वाल्मिक कराड मारहाण प्रकरणात ट्विस्ट, महादेव गितेने सांगितलं काय घडलं? सीसीटिव्ही ठरणार मोठा पुरावा!

धर्मादाय आयुक्तांनी दिल्या 'या' सूचना

विधी व न्याय विभागामार्फत गठित करण्यात आलेल्या तपासणी पथकामार्फत तपासणी अहवाल आणि समितीच्या शिफारसी सादर करुन त्यावर तात्काळ कारवाई करावी. शासनामार्फत धर्मादाय रुग्णालयांमधील रिक्त पदं तात्काळ भरावी. निर्धन रुग्णनिधी खात्याबाबतची अध्यायवत माहिती रुग्णालयाकडून घेऊन ती धर्मादाय आयुक्तांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करावी.

तसंच या योजनेची अंमलबजावणी न करणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई करावी, असे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे पुण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणानंतर धर्मादाय आयुक्तांनी कठोर निर्णय घ्यायला सुरूवात केल्याचं दिसत आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com