Vijayakumar Gavit Letter TO Heena Gavit Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Vijayakumar Gavit Letter to Heena Gavit: हार के बाद ही जीत है! रणरागिणीसारखी झुंजायला तयार हो!

सरकारनामा ब्यूरो

सागर निकवाडे

Vijayakumar Gavit Letter to Heena Gavit: भाजपचे मंत्री विजयकुमार गावित यांची कन्या हिना गावित यांची हॅट्रीक काँग्रेसचे गोवाल पाडवी यांनी रोखली. पराभूत झालेल्या आपल्या लेकीला विजयकुमार गावित (Vijayakumar Gavit) यांनी सोशल मीडियावर भावनिक पत्र लिहिलं आहे. हे पत्र सध्या व्हायरल होत आहे. मतदारसंघात या पत्रावर नेटकऱ्यांच्या उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत.

"शालेय वयापासूनच तू केवळ खेळाडू नव्हतीस तर खिलाडू वृत्तीची ही होतीस. त्यामुळेच समोर आलेल्या अनपेक्षित आव्हानाला तू खिलाडू वृत्तीने घेऊन त्यातून मार्ग काढून पुढे जाशील अशी मला नक्कीच खात्री आहे. 'जिंदगी की यही रीत है , हार के बाद ही जीत है!," अशा शब्दात लेकीला पुन्हा नवी उभारी देण्याचा प्रयत्न विजयकुमार गावित यांनी पत्रातून केला आहे.

लोकसभा निवडणुकीचा निकाल मी एक संधी समजतो, विश्लेषणाची, अवलोकनाची, अभ्यासाची, थोड्या विश्रांतीची आणि गगनभरारी घेण्यासाठी पुन्हा एकदा पंख पसरण्याची... तू याला अपयश न समजता संधी समजूनच या निकालाकडे बघशील अशी मला खात्री आहे.

शालेय वयापासूनच तू केवळ खेळाडू नव्हतीस तर खिलाडू वृत्तीची ही होतीस. त्यामुळेच समोर आलेल्या अनपेक्षित आव्हानाला तू खिलाडू वृत्तीने घेऊन त्यातून मार्ग काढून पुढे जाशील अशी मला नक्कीच खात्री आहे, असे गावित यांनी पत्रात म्हटलं आहे.

विजयकुमार गावित आपल्या लेकीला म्हणतात...

आज हे पत्र तुला लिहीत असताना मनात खूप भावना आहेत. गेल्या दहा वर्षात तू तुझं निर्माण केलेलं स्वतंत्र अस्तित्व, त्यासाठी घेतलेली मेहनत, तुझा अभ्यासूपणा, नंदुरबारच्या जनतेसाठी तू विचारपूर्वक केलेली कामं, आणि त्यासाठी घेतलेले कष्ट, पाठपुरावा, या सगळ्याचा मी साक्षीदार आहे.

संसदेत तू पहिल्यांदा पाऊल ठेवताना एका सामान्य बापासारखं माझंही काळीज भरून आलं होतं, की माझी ही छोटीशी लेक, एवढ्या मोठ्या संसदेच्या प्रांगणात कशी टिकेल... इतक्या दिग्गज लोकांमध्ये तिचा कसा निभाव लागेल? पण या साऱ्या शंकाच सिद्ध करत तू तुझं कर्तृत्व गेल्या दहा वर्षात परखड आणि स्पष्टपणे सिद्ध केलं त्याबद्दल मला तुझा प्रचंड अभिमान आहे.

माझी लेक प्रत्येक आव्हानाला खंबीरपणे..

आयुष्यात अनेक वळणे येतात बेटा, याचा आपण सगळ्यांनी अनेकदा अनुभव घेतला आहे. आपल्या लेकरांचं आयुष्य सरळ आणि सुखी असावं असं प्रत्येकंच आई-वडिलांना वाटतं, पण आयुष्य असं नसतं.

प्रत्येक नव्या वळणावर नवी आव्हाने आ वासून उभी असतात... त्या सगळ्यांना धीराने सामोरं जाणं, आणि अशा खडतर परिस्थितीतूनही वाट काढत यशाची कामना करणे, हेच खऱ्या योद्ध्याचं लक्षण आहे...आणि मला अभिमान आहे, की माझी लेक प्रत्येक आव्हानाला खंबीरपणे, समर्थपणे तोंड देऊन यश संपादन करते

त्यातून मार्ग काढून पुढे जाशील

या लोकसभा निवडणुकीचा निकाल मी एक संधी समजतो, विश्लेषणाची, अवलोकनाची, अभ्यासाची, थोड्या विश्रांतीची आणि गगनभरारी घेण्यासाठी पुन्हा एकदा पंख पसरण्याची... तू याला अपयश न समजता संधी समजूनच या निकालाकडे बघशील अशी मला खात्री आहे.

शालेय वयापासूनच तू केवळ खेळाडू नव्हतीस तर खिलाडू वृत्तीची ही होतीस. त्यामुळेच समोर आलेल्या अनपेक्षित आव्हानाला तू खिलाडू वृत्तीने घेऊन त्यातून मार्ग काढून पुढे जाशील अशी मला नक्कीच खात्री आहे.

तू स्वतः, आपले सगळे कुटुंबीय, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मित्रपक्ष या साऱ्यांनी घेतलेली मेहनत नंदुरबारचे लोक कधीच विसरणार नाहीत.... तुझ्या अभ्यासू वृत्तीचं, मेहनत करण्याच्या तयारीचं आणि धीरोदात्तपणाचं मला कायमच कौतुक असेल बेटा.

जिंदगी की यही रीत है ,

हार के बाद ही जीत है!!

रणरागिणीसारखी झुंजायला तयार हो.

हा आयुष्याचा नियम आहे. त्यामुळे, कोणत्याही परिस्थितीत निराश होऊ नकोस. नंदुरबारच्या जनतेने तुझ्यावर अमाप प्रेम केलं. त्यांचं प्रेम विसरु नकोस. त्यांच्या प्रेमातून उतराई होण्यासाठी आणखी काय करता येईल याचा नेहमीप्रमाणेच विचार कर, आणि स्वल्पविराम घेऊन पुन्हा एकदा रणरागिणीसारखी झुंजायला तयार हो... मी आणि तुझी आई सदैव तुझ्या पाठीशी आहोत !!

नेहमीसारखीच सदैव हसत रहा!

पप्पा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT