Gowal Padavi: काँग्रेसच्या नव्या खासदाराला आशीर्वाद देताना शिंदे गटातील नेत्याच्या डोळ्यात आनंदाश्रू!

Nandurbar Lok Sabha Constituency 2024:डॉ. हिना गावित यांना तिसऱ्यांदा महायुतीकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुरवातीपासून महायुतीचा घटक पक्ष असलेले शिंदे गटाचे नेते, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा विरोध होता.
Gowal Padavi
Gowal PadaviSarkarnama
Published on
Updated on

सागर निकवाडे

Nandurbar: दोन टर्म खासदार असलेल्या भाजपच्या हिना गावित यांना पराभवाची धुळ चारत काँग्रेसचे गोवाल पाडवी यांनी आपल्या वडिलांच्या पराभवाचा वचपा काढला. निवडून आल्यानंतर नवनियुक्त खासदार गोवाल पाडवी (Gowal Padavi) यांची विजयी मिरवणूक निघाली. या मिरवणुकीत मतदारांना अभिवादन करीत पाडवी यांनी थेट नंदुरबार शहरातील शिंदे गटाचं संपर्क कार्यालय गाठलं. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे आशीर्वाद घेतले.

गोवाल पाडवी यांची शिंदे गटाचे संपर्कप्रमुख रघुवंशी (Chandrakant Raghuvanshi) यांची गळाभेट घेतली. आशीवार्द देताना रघुवंशी यांना गहिवरुन आलं. काँग्रेसचा उमेदवार निवडून आल्याने त्यांच्या डोळ्यात आनंदअश्रू पाहायला मिळाले. डॉ. हिना गावित यांना तिसऱ्यांदा महायुतीकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुरवातीपासून महायुतीचा घटक पक्ष असलेले शिंदे गटाचे नेते, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा विरोध होता.

हिना गावित यांनी विकासकामे केली नसल्याचा आरोप काही नागरिकांनी केला. राजकारणात कायम कुणीही कोणाचा मित्र किंवा शत्रु नसतो, यांचा प्रत्यय नंदुरबारमध्ये आला. महायुतीत असतानाही पाडवी यांचा रघुवंशींनी मनापासून अभिनंदन केले.

सलग तिसऱ्यांदा भाजपच्या उमेदवार असलेल्या डॉ. हिना गावित (Heena Gavit) यांच्यासमोर यावेळी तगडे आव्हान होतं. गेल्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले काँग्रेसचे के.सी.पाडवी यांचे पुत्र गोवाल पाडवी यांनी हे आव्हान दिलं होतं

Gowal Padavi
Devendra Fadnavis: फडणवीसांनी ठाकरे-पवारांवर 'ब्र'ही काढला नाही...

नंदुरबार हा मतदारसंघ १९६२ पासून २०१४ पर्यंत काँग्रेसच्या ताब्यात होता. पण डॉ.विजयकुमार गावित यांनी काँग्रेसचे वर्चस्व मोडून काढले आणि हिना गावीत दोनवेळा इथून निवडून आल्या.

काँग्रेसने के.सी.पाडवी यांचे पुत्र आणि फारसे परिचयात नसलेल्या गोवाल पाडवी यांना उमेदवारी दिली होती. मात्र सुरुवातीपासूनच गांधी परिवाराविषयी अजूनही सहानुभूती बाळगणारा मतदार अद्यापही नंदुरबारमध्ये असल्याने यंदा त्याचा फायदा गोवाल पाडवी यांना नक्कीच झालेला दिसतो. आपल्या वडीलांच्या पराभवाचा वचपा गोवाल पाडवी यांनी काढला असे म्हणावे लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com