Devyani Pharande, Madhuri Misal, Meghana Bordikar, Shweta Mahale
Devyani Pharande, Madhuri Misal, Meghana Bordikar, Shweta Mahale Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

भाजपच्या चार महिला आमदारांना शर्विलकाचा गंडा!

Sampat Devgire

नाशिक : आईच्या वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत मागून भामट्याने आमदार देवयानी फरांदे (Devyani Pharande) यांच्यासह चार महिला आमदारांना (Womens) गंडा घातला. याबाबत आमदार फरांदे यांनी नाशिक सायबर पोलिसात माहिती दिल्यानंतर पोलिसांनी संशयिताशी संपर्क साधताच त्याने आ. फरांदे यांचे पैसे परत केले. Cyber crime branch identified fraud caller)

दरम्यान, अशा प्रकारामुळे खरोखरीच अडचणी असलेल्यांवर अन्याय होण्याची शक्यता अधिक असल्याचे आ. फरांदे यांनी बोलून दाखविले.

गेल्या आठवड्यात आमदार फरांदे यांना संशयित मुकेश राठोड याने मोबाईलवर संपर्क साधून आपण पंचवटीतील असून आईला वैद्यकीय उपचारासाठी पुण्यात दाखल केले आहे. तिच्या औषधोपचारासाठी साडेचार हजार रुपयांच्या मदतीची मागणी केली. यावर आ. फरांदे यांनी विचारपूस केल्यानंतर त्यांना संशयित राठोड यास खरोखरीच गरज असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी तत्काळ फोन पेवरून राठोड यास चार हजार रुपये पाठविले.

दोन दिवसांनी आ. फरांदे या राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी मुंबईत गेल्या असता, त्या ठिकाणी आमदार माधुरी मिसाळ, मेघना बोर्डीकर आणि श्‍वेता महाले यांच्याशी गप्पागोष्टी करताना त्यांनाही अशारीतीने फोन आला आणि संशयिताला आर्थिक मदत केल्याचे सांगितले.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आ. फरांदे यांनी त्यांच्या स्वीय सहायकाला नाशिकच्या सायबर पोलिसांकडे संपर्क साधण्यास सांगून घडलेली घटना सांगितली. त्यानुसार, सायबर पोलिसांनी संशयित मुकेश राठोड यास संपर्क साधून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचे सांगितले. यामुळे संशयित राठोड याने काही क्षणात आ. फरांदे यांना चार हजार रुपये ऑनलाइन परत पाठविले. दरम्यान, आ. फरांदे यांनी याबाबत जागरूकता दाखविल्याने भामट्याची बनवेगिरी उघड झाली.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT