Nandurbar Congress Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Congress Politics: काँग्रेसने दिला असा एक उमेदवार, त्याला पक्षाचे अध्यक्ष कोण? हेच माहित नाही!

Nandurbar Assembly Constituency: नंदुरबार विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने किरण तडवी यांना उमेदवारी जाहीर केल्याने अन्य इच्छुक बंडाच्या तयारीत.

Sampat Devgire

Nandurbar News: नंदुरबार जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाकडे आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या विद्यमान आमदार आणि पदाधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र हा आनंद किती काळ टिकतो, अशी देखील स्थिती आहे.

नंदुरबार मतदारसंघात सध्या भारतीय जनता पक्षाचे आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित विद्यमान आमदार आहेत. मंत्री डॉ गावित हे विविध सत्ता पदे आपल्याच कुटुंबात असलेले नेते आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात प्रबळ उमेदवार शोधणे काँग्रेससाठी सोपे नव्हते.

या स्थितीत काँग्रेस पक्षाने नवा चेहरा म्हणून किरण तडवी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदारसंघात विश्वनाथ वळवी यांसह विविध प्रदीर्घकाळ संघटनेत काम केलेले पदाधिकारी इच्छुक होते. या सर्वांची तडवी यांना उमेदवारी जाहीर झाल्याने निराशा झाली आहे.

त्यामुळे आता काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विश्वनाथ वळवी यांनी थेट बंडाचा झेंडा उभारला आहे. श्री. वळवी यांनी आपण अपक्ष उमेदवारी करणार असल्याचे जाहीर केले आहे. सोमवारी ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.

शनिवारी नंदुरबार येथे काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला. यावेळी श्री वळवी यांचं जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पवार, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष पंडित तडवी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे आप्पा वाघ, दिलावर शहा, बाळासाहेब मोरे, प्रतीक पाटील, मनोज चौधरी यांचे विविध पदाधिकाऱ्यांना तडवी यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला.

उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांनी उमेदवारी जाहीर झालेल्या तडवी यांच्यावर टिका केली आहे. विविध आक्षेप नोंदविले आहेत. नंदुरबार मतदारसंघात काँग्रेसने असा उमेदवार दिला आहे. जो पक्षाचा सदस्य देखील नाही.

ज्या उमेदवाराला काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण? याची माहिती नाही. काँग्रेस विषयी कुठलीही माहिती नसताना पक्षाने कोणते निकष विचारात घेऊन ही उमेदवारी जाहीर केली आहे, असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला.

काँग्रेस पक्षाने ज्यांना उमेदवारी दिली त्यांना पक्षाचे अध्यक्षच माहीत नसतील तर तो मतदारांमध्ये देखील चर्चेचा विषय आहे. त्यामुळे नंदुरबार विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षात श्री. वळवी यांनी अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला आहे.

काँग्रेस पक्ष उमेदवारीच्या वादातून बंडखोरी झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व जागांवर निवडणूक लढविणाऱ्या काँग्रेस पक्षाला सर्वकाही आलबेल आहे, अशी स्थिती नाही. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने नंदुरबार शहर विधानसभा मतदारसंघात मोठी पिछाडी सहन करावी लागली होती.

या मतदारसंघात पक्षाला भाजपचे प्रबळ उमेदवार आणि आदिवासी विकास मंत्री गावित यांच्याशी सामना करावयाचा आहे. अशा स्थितीत बंडखोरी झाल्याने काँग्रेसला चांगलीच धावपळ करावी लागणार आहे. तालुका अध्यक्ष वळवी यांची बंडखोरी समविण्यात पक्ष यशस्वी होतो का? याची आता सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT