Vivek Kolhe Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP Vivek Kolhe : जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विवेक कोल्हे आक्रमक; गणेश कारखान्याच्या 38 कोटींचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

Vivek Kolhe backs unopposed district bank poll, seeks Rs 38 crore recovery : अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठे विधान; निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा, गणेश कारखान्याला आर्थिक मदतीचेही आश्वासन

Pradeep Pendhare

Ganesh Cooperative Sugar Factory : अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे विविध स्तरांवर संपर्क वाढवत असताना भाजपचे विधान परिषदेचे आमदार विवेक कोल्हे यांनीही निवडणुकीबाबत स्पष्ट भूमिका मांडली.

जिल्हा बँकेवर लवकरच समविचारी संचालक मंडळ येईल आणि निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

राहाता येथील गणेश सहकारी साखर कारखान्याच्या रोलर पूजन कार्यक्रमात बोलताना आमदार विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांनी कारखान्याच्या आर्थिक स्थितीवर भाष्य केले. या कार्यक्रमाला महंत चैतन्यगिरी महाराज, कारखान्याचे अध्यक्ष सुधीर लहारे, उपाध्यक्ष विजय दंडवते, माजी अध्यक्ष ॲड. नारायण कार्ले यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते.

आमदार कोल्हे म्हणाले की, जिल्हा बँकेच्या (DCC Bank) माध्यमातून गणेश कारखान्याला आर्थिक अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला. मात्र, समविचारी संचालक मंडळ सत्तेवर आल्यानंतर कारखान्याला आवश्यक आर्थिक मदत मिळेल. तसेच, गणेश कारखान्याच्या सभासदांचे 38 कोटी रुपये संबंधितांनी परत करावेत, अशी मागणी त्यांनी केली.

मुख्यमंत्र्यांची शिष्टमंडळासह भेट घेण्याचे नियोजन असल्याचे सांगत आमदार कोल्हे म्हणाले, "पूर्वी आम्ही सत्ताधारी पक्षात होतो, आता सत्तेत आहोत. गणेश कारखान्यासमोरील प्रशासकीय आणि मानवनिर्मित अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करू. यंदा साडेतीन लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे."

गणेश कारखान्याच्या निवडणुकीनंतर आर्थिक व्यवहारांबाबत प्रश्न उपस्थित करत त्यांनी दावा केला की, कारखान्याचे 28 कोटी रुपये संबंधितांकडे येणे असून व्याजासह ही रक्कम 38 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच, राहुरी कारखान्याला पाच कोटी रुपयांची मदत देण्यात आल्याचाही त्यांनी उल्लेख केला.

गणेश कारखाना रोलर पूजनाला मी स्वतः बसलो. कारण जबाबदारी स्वीकारण्याची तयारी आपण ठेवली. जबाबदारी झटकणार नाही. तुमच्या सभासदांचे पैसे तुम्हाला हवे, असे म्हणता. कारखान्याच्या सभासदांचे पैसे परत मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील, असे सांगताना आमदार कोल्हे यांनी कोणाचेही नाव न घेता संबंधितांनी 38 कोटी रुपये परत करावेत, अशी मागणी पुन्हा केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT