Vivek Kolhe on DCC Bank Election : अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीवर विवेक कोल्हेंचं मोठं विधान; 'कोणी निवडणूक लादू नये', अमित शाह भेटीनंतरच्या विधानामुळे चर्चांना उधाण

Vivek Kolhe bats for consensus in Ahilyanagar DCC Bank poll after Amit Shah meeting : दिल्लीत अमित शाह यांच्या भेट अन् विवेक कोल्हेंची बिनविरोध निवडणुकीची भूमिका; जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग
Vivek Kolhe on DCC Bank
Vivek Kolhe on DCC BankSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar DCC Bank Election : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीची तयारी वेगाने सुरू झाली असून, जिल्ह्यातील विविध सहकारी संस्थांमध्ये ठराव मंजूर करण्याची प्रक्रिया गतीमान झाली आहे.

या पार्श्वभूमीवर भाजपचे कोपरगावचे आमदार विवेक कोल्हे यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. "सहकारात राजकारण होऊ नये. त्यामुळे जिल्हा बँकेवर कोणी निवडणूक लादू नये," असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानाची चर्चा केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या अलीकडील भेटीनंतर अधिक रंगू लागली आहे.

दिल्लीत दोन दिवसांपूर्वी आमदार विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांनी कुटुंबीयांसह केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांची सदिच्छा भेट घेतली होती. या भेटीत सहकार, शेती आणि इतर विषयांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर जिल्हा बँकेची निवडणूक शक्यतो बिनविरोध व्हावी, अशी भूमिका कोल्हे यांनी मांडल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांमध्ये संभाव्य उमेदवारांच्या समर्थनार्थ ठराव मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. भाजपचे (BJP) विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या नावाचा पहिला ठराव कर्जत तालुक्यातील नांदगाव विविध कार्यकारी सोसायटीने मंजूर केला. त्यानंतर विविध तालुक्यांमध्येही स्थानिक नेत्यांच्या समर्थनार्थ ठराव घेतले जात आहेत.

Vivek Kolhe on DCC Bank
Shrirampur Protest : 'हिंदूंना हायब्रिड हिंदुत्ववाद्यांपासूनच धोका'; प्रकाश चित्तेंनी गुन्हेगारीची हादरवणारी 'ऑडिओ क्लिप' भरसभेत ऐकवली

पारनेर तालुक्यातील भोंद्रे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीने माजी आमदार नंदकुमार झावरे यांच्या नावाचा ठराव मंजूर केला. हत्तलखिंडी सेवा सोसायटीने ज्येष्ठ नेते सबाजीराव गायकवाड, तर टाकळी ढोकेश्वर सेवा सोसायटीने जिल्हा मराठा समाज संस्थेचे विश्वस्त सिताराम खिलारी यांच्या नावाचा ठराव घेतला.

Vivek Kolhe on DCC Bank
Shrirampur Crime Protest :'टोपीपेक्षा भगव्या उपरण्याचीच भीती'; श्रीरामपूर हत्याकांडानंतर भाजपच्या महिला नेत्याचे खळबळजनक विधान

निवडणुकीच्या हालचाली सुरू असतानाच पारनेर तालुक्यात ठरावाशी संबंधित वादातून एका सोसायटी संचालकाच्या अपहरणाची घटना समोर आली. तसेच व्यापाऱ्याचे अपहरण करून लूट झाल्याचा प्रकारही चर्चेत राहिला. याच काळात जी. एस. महानगर बँकेच्या संचालिका गीतांजली शेळके यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेत जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसंदर्भातील काही मुद्द्यांकडे लक्ष वेधल्याची माहिती समोर आली आहे.

'बिनविरोधचा प्रयत्न राहील' : विवेक कोल्हे

जिल्हा बँकेच्या निवडणुकीविषयी बोलताना आमदार विवेक कोल्हे म्हणाले, "पूर्वापार ही निवडणूक बिनविरोध होत आली आहे. यावेळीही तसे झाले तर स्वागतच आहे. मागील निवडणुकीत 15 जागा बिनविरोध झाल्या होत्या. यावेळीही बिनविरोधसाठी प्रयत्न राहतील. मात्र कोणीही निवडणूक लादण्याचा प्रयत्न करू नये."

अमित शाह भेटीनंतर वाढल्या राजकीय चर्चा

अमित शाह यांच्या भेटीनंतर विवेक कोल्हे यांनी सोशल मीडियावर "दिल्लीत परिवारासह सदिच्छा भेट... सहकारासह विविध विषयांवर चर्चा... या भेटीत आणखी बरेच काही..." अशी पोस्ट केली होती. पोस्टमधील "आणखी बरेच काही" या उल्लेखामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे. मात्र, या वाक्याचा नेमका संदर्भ काय, याबाबत कोल्हे यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसह राज्यातील सहकार क्षेत्रातील आगामी घडामोडींवर राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com