Nashik city election 2026  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Municipal Corporation Election: भाजपच्या "हंड्रेड प्लस"ची शहरात उत्सुकता, कमी मतदानाचा फटका कोणाला बसणार?

Low Voting Percentage in Nashik Municipal Elections: महापालिका निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर पैसे वाटपाचे आरोप, गैरप्रकार चर्चेत आल्याने मतदानाचे प्रमाण घटल्याचे बोलले जाते.

Sampat Devgire

Nashik Civic Elections: नाशिक महापालिका निवडणुकीत काल मोठे गैरप्रकार झाल्याचे आरोप आहेत. अनेक ठिकाणी पैसे वाटप झाल्याचे व्हिडिओ प्रसारित झाले. या सर्व वादात मतदानाचे प्रमाण घटले. त्याचा फटका प्रस्थापित राजकीय पक्षांना बसण्याची चिन्हे आहेत.

नाशिक महापालिका निवडणुकीत ३१ प्रभागांतील १२२ उमेदवारांसाठी काल मतदान झाले. मतदान सुरू असताना मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार आणि पैसे वाटप झाल्याच्या तक्रारी आल्या. यासंदर्भात विरोधकांनी भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षावर आरोप केले आहेत.

शहरात सहा ठिकाणी मतमोजणी करण्यात येणार आहे. एक तासापूर्वी मोठ्या पोलीस बंदोबस्तात मतमोजणीच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. येत्या काही वेळातच निकालाचा कल स्पष्ट होईल.

या पार्श्वभूमीवर महापालिकेत सत्तेत येण्याचा दावा भाजपने केला आहे. भाजपला 100 जागा मिळतील असा दावा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. त्यासाठी पक्षाने आपली ताकद पणाला लावली होती. मात्र काही उमेदवारांची निवड हा वादाचा विषय ठरला.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर पक्षांतर झाले. विशेषतः शिवसेना उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या अनेक नगरसेवकांनी भाजप तसेच शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश केला. उमेदवारीसाठी भाजपमध्ये गेलेल्या अनेकांची निराशा झाली. निराश झालेल्या इच्छुकांनी उमेदवारी हुक्ताच अन्य पक्षात प्रवेश करीत निवडणुकीच्या मैदानात उतरले.

काल दिवसभर अनेक ठिकाणी पैसे वाटप झाल्याच्या तक्रारी होत्या. त्याचा परिणाम शहरभर वाद आणि समाज माध्यमांवर येणाऱ्या नकारात्मक बातम्या दिसल्या. परिणामी मतदान केंद्रांवर गर्दी कमी झाली. मतदानाचा टक्का घसरला.

या निवडणुकीच्या गोंधळात आणि कमी झालेले मतदान याचा कोणावर परिणाम होतो याची चर्चा आता सुरू झाली आहे. विशेषतः सर्वाधिक १०० जागा जिंकण्याचा दावा करणाऱ्या भाजपचे टार्गेट कमी मतदानामुळे प्रभावित होण्याची चर्चा जोरात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT