Nashik Politics : मुकेश शहाणे यांनी शेवटच्या दिवशी डाव उलटवला; थेट गिरीश महाजन यांच्या उमेदवारालाच आणले अडचणीत!

NMC Election Update : मतदानाच्या आदल्या दिवशी भाजप बंडखोर मुकेश शहाणे यांना ठाकरे बंधूंनी दिले बळ, दोन्ही उमेदवारांचा पाठिंबा
Rebel BJP leader Mukesh Shahane addressing supporters after receiving backing from Shiv Sena UBT and MNS leaders ahead of Nashik civic polls.
Rebel BJP leader Mukesh Shahane addressing supporters after receiving backing from Shiv Sena UBT and MNS leaders ahead of Nashik civic polls.Sarkarnama
Published on
Updated on

NMC Election News : नाशिक महापालिका निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले. या निमित्ताने भाजप बंडखोर मुकेश शहाणे यांनी नाट्यमय खेळी केली. या माध्यमातून त्यांनी भाजपला धक्का देण्याचा प्रयत्न केला.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे सुधाकर बडगुजर यांनी भाजप प्रवेश केला. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा विश्वास देखील त्यांनी संपादन केला. त्यामुळे महापालिका निवडणुकीत भाजप अंतर्गत मोठी खेळी झाली होती.

या निमित्ताने विद्यमान नगरसेवक मुकेश शहाणे यांच्या ऐवजी दीपक बडगुजर यांना उमेदवारी देण्यात आली होती. उमेदवारीने भाजप पक्षात मोठा वाद झाला होता. हे प्रकरण थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत गेले होते.

भाजपने दीपक बडगुजर यांची उमेदवारी कायम ठेवली. त्यामुळे अडचणीत आलेल्या मुकेश शहाणे यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी केली. सध्या या प्रभागात बडगुजर आणि शहाणे यांच्या तीव्र राजकीय संघर्ष निर्माण झाला आहे.

या वादातच शहाणे यांच्यावर विविध प्रकारे दबाव आणून त्यांची माघारी घेण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र बडगुजर यांचे कट्टर विरोधक असलेले शहाणे त्याला बदले नाहीत. त्यांनी प्रचारक आघाडी घेऊन बडगुजर यांच्या पुढे आव्हान निर्माण केले होते.

मतदानाला एक दिवस शिल्लक असताना या प्रभागात मोठी राजकीय खेळी झाली. शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांनी शहाणे यांना पाठिंबा जाहीर केला. त्यासाठी वरिष्ठ स्तरावरून प्रयत्न झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

Rebel BJP leader Mukesh Shahane addressing supporters after receiving backing from Shiv Sena UBT and MNS leaders ahead of Nashik civic polls.
Vijay Wadettiwar On Girish Mahajan :''मला गिरीश भाऊंचा हेवा वाटतो''|Congress|Pune Maha Arogya Shibir

बंडखोर मुकेश शहाणे यांना आता शिवसेना आणि मनसेचा पाठिंबा मिळाल्याने त्यांचा दावा अधिक भक्कम झाला आहे. यानिमित्ताने भाजप उमेदवार बडगुजर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज दिवसभर शहाणे यांना जाहीर झालेला पाठिंबा चर्चेचा विषय होता.

या संदर्भात शहाणे यांनी आपण भाजपचे (BJP) निष्ठावंत होतो. मात्र काही अपप्रवृत्तींनी आपल्या विरोधात षडयंत्र केले. जे कार्यकर्ते आणि कुटुंबीय यांना पोलिसांकडून सातत्याने त्रास दिला जात आहे. गुन्हे दाखल केले जात आहेत.

Rebel BJP leader Mukesh Shahane addressing supporters after receiving backing from Shiv Sena UBT and MNS leaders ahead of Nashik civic polls.
Nashik BJP : नाशिकमध्ये काय घडलं? भाजपच्या इतिहासातील सर्वांत मोठी हकालपट्टी, माजी महापौरांसह 54 जण बाहेर

कितीही त्रास दिला तरी आपण आता कोणत्या स्थितीत निवडणुकीतून माघार घेणार नाही. आपल्या विरोधकांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. जनता माझ्या पाठीशी आहे. यासंदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे. त्यांचे हे ऋण मी कदापी फेडू शकणार नाही. मात्र आता निवडणुकीच्या निकालातून बडगुजर यांना धडा शिकवण्याचा आपला निर्धार अधिक भक्कम झाला आहे, असे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com