Yashomati Thakur News Updates, Yashomati Thakur on child marriage issue
Yashomati Thakur News Updates, Yashomati Thakur on child marriage issue  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

राज्यभरात अकराशे बालविवाह रोखले!

Sampat Devgire

नाशिक : कोविड काळात (Covid epidemic) राज्यात मोठ्या प्रमाणात बालविवाह (Child marriages) झाल्याचे प्रकार समोर आले असून महिला व बालविकास (Womens and Child welfare) विभागाने जवळपास अकराशे बालविवाह थांबविल्याची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी देताना बालविवाह थांबविण्याच्या कार्यात नागरिकांनी देखील सहभागी होण्याचे आवाहन केले. (Yashomati Thakur on child marriage issue)

नाशिक दौऱ्यावर आलेल्या मंत्री ठाकूर यांनी ही माहिती दिली. ठाकूर यांनी सांगितले, की महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने गाव पातळीवरही बालविवाह व बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी जनजागृती केली जाणार आहे. नागरिकांना यासंदर्भात महिला व बालविकास विभागाला माहिती कळविण्याचे आवाहन त्यांनी केले. राज्यात भीक मागणाऱ्यांमध्ये बालकांचे प्रमाण लक्षणीय आढळून येत आहे. ही गंभीर बाब असून बालकांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रम दिला जाणार आहे. अशा मुलांसाठी डे केअर शाळा व कम्युनिटी शाळांचे नियोजन करण्यात आले आहे.

तांत्रिक कारणांमुळे महिला दिनी महिला धोरणाचा मसुदा सादर करता आला नसल्याची खंत व्यक्त केली. महिला धोरणात लिंग समानतेला महत्त्व देण्यात आले आहे. महिला धोरणाचे तीन टप्पे राहणार असून पहिल्या टप्प्यात जिल्हाधिकारी, दुसऱ्या टप्प्यात मंत्री व तिसऱ्या व अंतिम टप्प्यात मुख्यमंत्र्यांची निगराणी राहणार आहे. महिलांना सुरक्षितता प्रदान करण्यासाठी महिला धोरणाची आखणी केल्याचे त्यांनी सांगितले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT