Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal News : सात आमदार असल्याने पालकमंत्रिपदासाठी राष्ट्रवादीचाच ‘क्लेम'...

Sampat Devgire

Chhagan Bhujbal News : नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा आमदार आहेत. इगतपुरीचे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर हेदेखील आमचेच आहेत. त्यामुळे राजकीय स्थितीचा विचार करता पालकमंत्रिपदासाठी आमचा क्लेम अतिशय योग्य आहे, असे राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. (NCP have a maximum and six MLAs in Nashik District)

नाशिकचे (Nashik) पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) हे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कायम आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) तसेच भाजपच्या (BJP) आमदारांचा अपेक्षाभंग झाला आहे.

नाशिकच्या पालकमंत्री म्हणून भाजपचे नेते गिरीश महाजन उत्सुक होते. राज्य मंत्रिमंडळ व पक्षातील त्यांचे स्थान लक्षात घेता, ही अपेक्षा सहज पूर्ण होईल, अशी त्यांच्या समर्थकांची अपेक्षा होती. आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपला ते हिताचेदेखील होते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे व राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांचे मन सतत नाशिकमध्ये रमलेले असते. ते नाशिकचेच (येवला) आमदार आहेत. या पक्षाचे सध्या जिल्ह्यात सर्वाधिक सहा आमदार आहेत. जिल्ह्याच्या राजकारणावर पकड असावी, यासाठी त्यांचे समर्थक सतत प्रयत्नशील असतात.

मात्र, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस दोघांचाही अपेक्षाभंग झाला. या पार्श्वभूमीवर भुजबळ म्हणाले, पालकमंत्र्यांची नवी यादी जाहीर झाली, त्यात नाशिकसह रायगडचा समावेश नाही. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ६ आणि पूर्वीचे आमचे इगतपुरी-त्र्यंबकेश्‍वरचे आमदार हिरामण खोसकर असे ७ आमदार आहेत. त्यामुळे सर्वाधिक आमदार आमचे असल्याने पालकमंत्रिपदावर आमचा ‘क्लेम' आहे.

मुंबईत पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, की आमच्या अगोदर मुख्यमंत्र्यांचा गट भाजप सोबत सत्तेत सहभागी झाला होता. आम्ही नंतर समाविष्ट झालो. त्यामुळे अगोदर पालकमंत्रिपदाची जबाबदारी दिली, त्यांची समजूत काढणे आणि आमच्याकडे पालकमंत्रिपद देण्याच्या प्रक्रियेत वेळ जातो आहे. सामंजस्याच्या भूमिकेतून, चर्चेतून मार्ग निघतात. चर्चा सुरू आहे, पण मी चर्चेत नाही. मार्ग कधी निघेल तेव्हा निघेल, जनतेचे काहीही अडलेले नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT