Satyajeet Tambe
Satyajeet Tambe  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon Politics : सत्यजीत तांबेंच्या प्रचारात कॉंग्रेस नेत्यांची मुले: शिवसेनेच्या नेत्यांची जिल्हा प्रमुखांशी चर्चा

सरकारनामा ब्युरो

Jalgaon Politics : नाशिक पदवीधर निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरू झाला आहे. अशातच कॉंग्रेसमधून निलंबीत झालेले अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांच्या प्रचारात कॉंग्रेस नेत्यांची मुले सहभाग घेत असल्याने राजकीय खळबळ उडाली आहे. शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी कॉंग्रेस जिल्हा प्रमुखांशी चर्चा करून महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून ही गंभीर बाब आहे,आपण लक्ष देऊन वरीष्ठांशी चर्चा करावी, असे सांगितल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

नाशिक पदवीधर निवडणूकीतम शिवसेना प्रणित उमेदवार शुंभागी पाटील यांना महाविकास आघाडीने पाठींबा दिला आहे. त्यांच्या विजयासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. मात्र दुसरीकडे अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे नुकतेच जळगाव दौऱ्यावर आले होते. त्यांनी ठिकठिकाणी जिल्ह्यात प्रचार केला. त्यावेळी कॉंग्रेस नेत्यांची मुल तांबे यांच्या व्यासपीठावर प्रचारासाठी होती.

जळगाव येथे कॉंग्रेसचे प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष डॉ.उल्हास पाटील यांची कन्या डॉ.केतकी पाटील लेवा भवनात झालेल्या मेळाव्यात व्यासपीठावर होत्या. तर रावेर येथील कॉंग्रेसचे आमदार शिरीश चौधरी यांचे पुत्र धनजंय चौधरी हे फैजपूर येथे झालेल्या मेळाव्यात सत्यजीत तांबे यांच्या व्यासपीठावर होते. त्यामुळे जिल्ह्यात राजकीय खळबळ उडाली आहे.

शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत आज जळगाव दौऱ्यावर आहेत, याबाबत त्यांच्याशी सपंर्क साधला असता,‘सरकारनामा’शी बोलतांना ते म्हणाले की, सत्यजीत तांबे कॉंगेसमध्ये होते, त्यांनी कॉंग्रेस पक्षाशी बंडखोरी केली आहे,आज त्यांच्या सोबत प्रचारास कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांची मुलं असतील तर त्याबाबत कॉंग्रेसनेच निर्णय घेण्याची गरज आहे, आम्ही त्याबाबत काहीही बोलू शकत नाही.

मात्र आपण महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून स्थानिक नेते जिल्हा प्रमुख प्रदीप पवार यांच्याची संपर्क साधला आहे, ही अत्यंत गंभीर बाब आहे. याबाबत आपण वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घ्यावा असे त्यांना सांगितले आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षाच्या पातळीवर हा निर्णय होईल. मात्र महाविकास आघाडी म्हणून आम्ही शुंभागी पाटील यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत,आमची प्रचाराची रणनीती ठरली आहे, त्यानुसार प्रचार करीत आहोत, शुंभागी पाटील या विजयी होतील याची आम्हाला खात्री आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT