
Satara News : दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे NCP युवा आमदार रोहित पवार Rohit Pawar हे सातारा दौऱ्यावर आले होते. त्यांनी नियोजन समितीच्या निधी खर्च न झाल्याबद्दल सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. आता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे Mnse अध्यक्ष अमित ठाकरे Amit Thackeray उद्या (शनिवारी) साताऱ्याच्या दौऱ्यावर येत आहेत. रयत शिक्षण संस्थेतील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्या अभिवादन करुन ते आपल्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याची सुरवात करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याबाबत मनसेच्या कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राष्ट्रवादीचे युवा नेते व आमदार रोहित पवार यांनी साताऱ्यात येऊन सावित्रीबाई फुले यांच्या नायगाव याजन्मगावी भेट दिली होती. तसेच तेथील विकास कामांचा साडे नऊ कोटींचा निधी सध्याच्या शिंदे, फडणवीस सरकारने स्थगित केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. तसेच जिल्हा नियोजन समितीचा निधी मोठ्याप्रमाणात खर्चाविना राहिल्याबद्दलही टीका केली होती.
या राष्ट्रवादीच्या युवा आमदाराच्या दौऱ्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे साताऱ्याच्या दौऱ्यावर येत आहेत. शनिवारी सायंकाळी सहाला त्यांचे साताऱ्यात आगमन होईल. त्यानंतर महाराष्ट्र नवनर्माण सेनेच्या वतीने त्यांचे सातारा शासकिय विश्रामगृहात स्वागत केले जाणार आहे.
दुसऱ्या दिवशी रविवारी (ता.२९) सकाळी साडे दहा वाजता अमित ठाकरे हे रयत शिक्षण संस्थेतील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन आपल्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यास सुरवात करणार आहेत. त्यानंतर सातारा शासकिय विश्रामगृहात ते सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
त्यानंतर अडीच ते तीन या वेळेत ते पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधतील. दुपारी तीन वाजता ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हा मध्यवर्ती कार्यालयास (स्थळ : प्रिती हॉटेलच्या मागे) भेट देतील. युवकांत अमित ठाकरे यांच्या या दौऱ्याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झालीआहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.