Dr. Neelam Gorhe & Eknath Shinde
Dr. Neelam Gorhe & Eknath Shinde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dr. Neelam Gorhe: भाजप शिंदेंची काय अवस्था करील, याचा त्यांनी विचार करावा!

Sampat Devgire

नाशिक : कोणाला कितीही तयारी करू द्या, शिवसेनेला (Shivsena) काहीच फरक पडत नाही. शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला (Dashahara Public meeting) शिवतीर्थावर (Shivaji Park) गर्दी होणार याची आम्हाला खात्री आहे. त्यामुळे आम्हाला तयारीची गरज नाही. मनातील उर्मी ज्यांच्याकडे आहे, तर ते सर्व शिवतीर्थावर येणारच, असे प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती (Maharashtra Council vice chairmen)डॅा. नीलमताई गोऱ्हे (Dr. Neelamtai Gorhe) यांनी केले. (BJP will make worst with Eknath Shinde in Future)

डॅा. गोऱ्हे दोन दिवसांच्या दौऱ्यावर नाशिकला आल्या होत्या. यावेळी त्यांनी कुलदैवत चांदवडच्या रेणुकादेवी व वणीच्या आद्यपीठ सप्तश्रृंगी देवीची पूजा केली.

त्या म्हणाल्या, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नाशिकच्या अधिवेशनाच्या प्रारंभी `दार उघड बये दार उघड` असे म्हटले होते. त्यानंतर राज्यात सत्तांतर होऊन १९९५ मध्ये शिवसेनेची सत्ता आली होती. त्यामुळे मी देखील `दार उघड बये दार उघड` ही मोहीम हाती घेतली आहे. रेणुकामाता आणि सप्तश्रृंगी मातेचा प्रसाद शिवतीर्थावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना देणार आहे, असेत्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील इगतपुरी येथील आदिवासी पालकांनी आपल्या पाच मुलांना पैसे व राजगारासाठी विकल्याचे प्रकरण घडले होते. त्याबाबत डॅा. गोऱ्हे यांनी पाठपुरावा केला होता. त्याबाबत त्या म्हणाल्या, नाशिकच्या वेठबिगारी प्रकरणाबाबत मी पत्रव्यावहार केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला आहे.

तसेच धडगाव (नंदुरबार) येथील युवतीवर बलात्कार करून तीची हत्या करण्यात आली. मात्र पोलिसांनी त्याची दखल घेतली नव्हती. त्याबाबत पोलिसांनी संशयास्पद मृत्यू असा गुन्हा का दाखल केला नाही?, असा प्रश्न त्यांनी केला. त्या म्हणाल्या, आधी बलात्कार करायचा, नंतर खून करायचा, ही गुन्हेगारांची कार्यपद्धती आहे. याबाबत पोलिसांनी वेळीच हे प्रकरण गांभिर्याने घ्यायला हवे होते. या अन्यायग्रस्त मुलीच्या कुटंबीयांवर दबाव होता. यासंदर्भात कुठल्याही प्रकरणावर मंत्री महोदयांनी बोलतांना तारतम्य बाळगावे.

राज्यातील शिंदे सरकार तसेच केंद्रातील भाजप सरकारवर त्यांनी टिका केली. त्या म्हणाल्या, केंद्राकडून करण्यात येणारे विकासाचे दावे फोल आहेत. राज्यातील शिंदे, फडणवीस सरकारकडून डोंगर भुईसपाट करण्याचा कारखाना सुरु करण्यात आला आहे.

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेबाबत केलेल्या विधानावर प्रतिक्रीया विचारली असता, त्या म्हणाल्या, किरकोळ माणसाच्या बोलण्यावर उत्तर देऊ नका, असा सल्ला मला एकाने दिला आहे. त्यामुळे त्याबाबत काहीही बोलणार नाही. मात्र ते तयार असतील, तर त्यांनी निवडणुकीला सामोरं जावे.

थापा साधा माणूस!

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत राहिलेल्या थापा याने एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. त्याबाबत त्या म्हणाल्या, थापा हा साधा माणूस आहे. त्यांची दिशाभूल झाली असेल. त्यांचा गैरसमज झाला असेल. मला तर वाटते, एकनाथ शिंदें यांचाही गैरसमज झाला असेल. पुढे भविष्यात भाजप त्यांची काय अवस्था करेल, याचा त्यांनी विचार करावा.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT