कळवण : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) कळवण शहराध्यक्ष जितेंद्र पगार (Jitendra Pagar) यांच्याबरोबर तालुक्यातील माजी पदाधिकाऱ्यांसह (Ex Office bearers) काही अन्य पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईत (Mumbai) शिवसेनेच्या (Shivsena) शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. (NCP office bearers joins Shinde Group)
शिवसेनेचे कळवण तालुक्यातील पदाधिकारी मातोश्रीशी एकनिष्ठ असल्यामुळे शिंदे गटात तालुक्यातून अद्याप कुणीही गेले नाही. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी- माजी पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचा पहिल्या माळेचा मुहूर्त शोधून तालुक्यात खळबळ उडवून दिली. गेल्या काही दिवसांपासून या प्रवेश सोहळ्याच्या तालुक्यात चर्चा रंगल्या होत्या. अखेर प्रवेश सोहळा पूर्ण होऊन चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवण शहराध्यक्ष जितेंद्र पगार, माजी उपनगराध्यक्षा अनुराधा पगार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष संदीप वाघ, एकलव्य युवक संग्राम परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पवार, मातोश्री निर्मलाबाई देशमुख आश्रमशाळेचे अध्यक्ष भूषण देशमुख, समता परिषदेचे तालुका उपाध्यक्ष हेमंत शेवाळे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. जितेंद्र पगार यांच्या हाती भगवा ध्वज देत सर्वांच्या गळ्यात भगव्या मफलर घालून मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले.
शिंदे गटात प्रवेश करणारे कळवण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी हे पहिले ठरणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत वाद व नाराजी नाट्यातून या पदाधिकाऱ्यांचे शिंदे गटात पक्षांतर झाल्याचे बोलले जात आहे.
---
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.