Ram Shinde Vs Radhakrishna Vikhe Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ram Shinde Vs Radhakrishna Vikhe Patil: राम शिंदे-विखे पाटलांमधील वादावर फडणवीस काय मार्ग काढणार ?

Ahmednagar BJP News: राम शिंदे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातील राजकीय वादामुळे नगर भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर

सरकारनामा ब्यूरो

Ahmednagar News: अहमदनगरमधील जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक राज्यात चर्चेचा विषय ठरली. कर्जत-जामखेड मतदारसंघातील दोन्ही बाजार समित्यांच्या अटीतटीच्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी यांना 9-9 जागा मिळाल्या. यानंतर जामखेडमध्ये ईश्वर चिठ्ठी काढून सभापतीपदाची माळ भाजपचे शरद कार्ले यांच्या गळ्यात पडली तर उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कैलास वराट यांची वर्णी लागली.

यानंतर भाजप आमदार राम शिंदे आणि भाजप नेते व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील यांच्यात वादाची ठिणगी पडली. जामखेड बाजार समितीच्या सभापती निवडीवेळी खासदार सुजय विखे यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना छुपा पाठिंबा दिला, असा गंभीर आरोप राम शिंदे यांनी केला. त्यांच्या आरोपानंतर विखे पाटलांनीही त्यांना प्रतिउत्तर देत निशाणा साधला.

राम शिंदे म्हणाले होते की, "राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील यांनी जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपच्या विरोधात काम केले. या गोष्टी वरिष्ठांच्या कानावर घातल्या आहेत. आमचा पक्ष भाजप आहे, काँग्रेस नाही. विधानसभेतही विखेंनी विरोधात काम केलं होतं. त्यानंतर आताही विरोधात काम केलं, याचा अवाहल वरिष्ठांना दिला जाईल", असं शिंदे म्हणाले होते.

यावर प्रत्युत्तर देताना सुजय विखे म्हणाले होते की, "राम शिंदेंच्या मनामध्ये काही नाराजी असेल तर मला वाटतं पक्षश्रेष्ठी याबाबत निर्णय घेतील. पक्षश्रेष्ठी आम्हालाही बोलावतील. त्यानंतर याबाबत त्यांचे समज-गैरसमज दूर होतील. निवडणुका होतात तेव्हा नाराजी होऊ शकते. काही चुका प्रत्येकाच्या असतात", असं ते म्हणाले होते.

दरम्यान, राम शिंदे यांनी केलेल्या आरोपामुळे नगर जिल्ह्यातील राम शिंदे आणि विखे पाटील या भाजपच्या दोन बड्या नेत्यांमधील अंतर्गत कलह समोर आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. त्यामुळे आता नगरमधील भाजपच्या या दोन बड्या नेत्यांमधील हा वाद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कसा रोखणार? असा सवाल आता राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT