Aryan Khan Case: मुंबईत चार फ्लॅट, महागडी घड्याळं, सहा विदेश दौरे, खर्च फक्त साडेआठ लाख; वानखेडेंबाबत धक्कादायक खुलासे..

Sameer Wankhede Exposed: शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करणारे समीर वानखेडेंबाबत..
Aryan Khan Case : Sameer Wankhede :
Aryan Khan Case : Sameer Wankhede :Sarkarnama

Mumbai News : सिने-अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan Case) याला अटक करणारे एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhed) यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसत आहे. वानखेडे यांच्याशी संबंधित ठिकाणांवर सीबीआयकडून धाडसत्र सुरूच आहे. यामुळे वानखेडे यांचा पाय आणखीनच खोलात गेला आहे. (Latest Marathi News)

समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी आपल्या कुटुंबासह अनेक विदेश दौरे केले आहेत. इतकंच नाही तर वानखेडेंकडे बेहिशोबी मालमत्ता आहे. अशी बाब एनसीबीच्याच अहवालातून समोर आली आहे. समीर नवानखेडे यांच्याविरोधात आर्थिक अपहार-गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्याल आला आहे.

Aryan Khan Case : Sameer Wankhede :
High Court on Sameer Wankhede: समीर वानखेडेंना दिलासा; 24 मे पर्यंत अटक नाही

समीर वानखेडे आणि त्यांच्यासोबत काही लोकांनी मिळून शाहरूख खानकडे मुलाला सोडण्यासाठी २५ कोटींची मागणी केल्याचे, सीबीआयच्या नमूद केले गेले आहे. तसेच, पैसे न दिल्यास आर्यनला ड्रग्जच्या खोटी केस बनवून त्याला अडकण्याची धमकीही दिली गेली, असे ही सीबीआयने म्हंटले आहे.

दक्षता विभागाने तपास केला होता :

एनसीबी दक्षता विभागाकडून आर्यन खान प्रकरणाची चौकशी करण्यात आली होती. सादर कलेल्या अहवालात आर्यन खान सोबतच त्याचे मित्र अरबाज मर्चंट याला ही या प्रकरणीत गोवण्यात आले, तर काही संशयितांची नावं यामधून जाणीवपूर्वक वगळण्यात आली होती, असे ही म्हंटले गेले आहे.

अहवालात नमूद केले आहे की, क्रूझवर टाकलेल्या छाप्यादरम्यान, एका संशयिताजवळ एक रोलिंग पेपर सापडला होता.मात्र या व्यक्तिला सोडून देण्यात आले. याप्रमाणे कारवाईच्या रात्री आर्यन खानला एनसीबी (NCB) कार्यालयात आणले गेले. यावेळी सादर केलेला डीव्हीआर आणि हार्ड कॉपी यामध्ये फरक आढळून आला.

Aryan Khan Case : Sameer Wankhede :
PM Modi On The Kerala Story: कर्नाटक प्रचारात 'केरळा स्टोरी'ची एन्ट्री; दहशतवादी कटाचा खुलासा केल्याचा मोदींचा दावा!

5 वर्षात एकूण 6 विदेश दौरे :

2017 ते 2021 या पाच वर्षाच्या कालात समीर वानखेडे यांनी आपल्या कुटुंबासोबत सहा परदेश दौरा केल्याची माहिती समोर आली. ब्रिटन, आयर्लंड, पोर्तुगाल, दक्षिण आफ्रिका आणि मालदीव या देशांचा यात समावेश आहे. या पाच परदेश दौऱ्यात ते एकूण 55 दिवस विदेशात राहिले होते. या विदेश दौऱ्यासाठी ८.७५ लाख रूपये खर्च आल्याचे, वानखेडे कडून सांगण्यात येत आहे. मात्र एवढ्या पैशात विमान प्रवासाचा खर्च निघणेही कठिण आहे.

समीर वानखेडे यांच्याजवळ उंची व अत्यंत महागडी घड्याळे आणि इतर मालमत्तांचाही उल्लेख करण्यात आला आहे, ज्या त्यांच्या उत्पन्नापेक्षा कितीतरी अधिक आहे. यामध्ये अत्यंत महागडे रोलेक्स घड्याळाचाही समावेश आहे. मुंबईत चार फ्लॅट आणि वाशिम जिल्ह्यात जमीन आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com