Praniti Shinde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Congress Nashik News : जर्जर झालेल्या काँग्रेसला प्रणिती शिंदे काय मात्रा देणार?

what treatment will Praniti Shinde given to the dilapidated congress-उत्तर महाराष्ट्र काँग्रेसच्या सोमवारी होणाऱ्या आढावा बैठकीत पदाधिकाऱ्यांची झाडाझडती

Sampat Devgire

Praniti Shinde News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षबांधणीसाठी काँग्रेसने प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडे उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी सोपविली आहे. मात्र, उत्तर महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात, अर्थात विशेषतः नाशिकमध्ये हा पक्ष गटबाजीने अक्षरशः जर्जर झाला आहे. त्याला त्यांच्याकडे काय मात्रा असेल, याची उत्सुकता आहे. (To activete Congress organization is a big challange now)

काँग्रेसच्या (Congress) उत्तर महाराष्ट्राची आढावा बैठक नाशिकला (Nashik) होत आहे. आमदार प्रणिती शिंदे, (Praniti Shinde) माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे.

आमदार प्रणिती शिंदे यांची उत्तर महाराष्ट्र संपर्क नेत्या म्हणून नियुक्ती झाल्यानंतर येत्या सोमवारी त्या नाशिकला येत आहेत. सोमवारी (ता. ९) उत्तर महाराष्ट्रातील संघटनात्मक आढावा बैठक होणार आहे. त्यात नाशिक, नगर, नंदुरबार, जळगाव आणि धुळे जिल्ह्यांचा आढावा घेण्यात येणार आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय शिबिर उदयपूर (राजस्थान) येथे झाले होते. त्यात पक्षाचे काम गतिमान करण्यासाठी नेत्यांनी विविध सूचना केल्या होत्या. विविध ठराव झाले होते. यामध्ये मंडल समित्या सक्रिय करणे, ग्राम समित्या स्थापन करणे, ब्लॉक कार्यकारिणी सक्रिय करणे, जिल्ह्यातील संघटनात्मक रिक्त पदांवरील नियुक्त्या, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी पुनर्रिक्षण आदींचा त्यात समावेश होता. सध्याचे शहर व जिल्ह्यातील पक्षाचे काम विचारात घेतल्यास यातील किती व काय काम झाले असेल हे पक्षातील कार्यकर्त्यांनाही सांगता येणार नाही, अशी स्थिती आहे.

विशेषतः नाशिक शहरातील काँग्रेसची स्थिती पक्षापेक्षा मी मोठा या वादाने ग्रासली आहे. पक्षाचे राज्यस्तरीय बारा पदाधिकारी येथे आहेत. मात्र, त्यांचे भाजप आणि जनतेच्या प्रश्नावर चुकूनही कधीही तोंड उघडत नाही. काँग्रेसची वाढ खुंटण्यात विरोधी पक्ष नव्हे, तर पक्षातील हे पदाधिकारी जबाबदार आहेत. ते इतरांना कामही करू देत नाहीत अन् नव्या लोकांना संधीही मिळू देत नाहीत. यावर प्रणिती शिंदे यांची मात्रा तरी लागू पडेल काय? असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT