Congress News : वासनिकांचा टोला; म्हणाले, मोदीसाहेब तुमचे सरकार कोणासाठी?

Congress SC, ST wing`s two days workshop begins in Shirdi-खासदार मुकुल वासनिक यांच्या उपस्थितीत ‘संविधान के राह पर’ राज्यस्तरीय प्रशिक्षण शिर्डी येथे सुरू झाले.
Mukul Wasnik
Mukul WasnikSarkarnama
Published on
Updated on

Congress News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कृती आणि उक्ती यात मोठा फरक आहे. हा विरोधाभास जनतेच्या व देशातील कार्यकर्त्यांच्या चांगलेच लक्षात आले आहे. हे सरकार उपेक्षितांसाठी काम करतंय की प्रस्थापितांसाठी, असा प्रश्‍न राज्यसभा खासदार मुकुल वासनिक यांनी व्यक्त केला. (PM Narendra Modi`s act & speech has a vast differance)

प्रदेश काँग्रेस काँग्रेसच्या (Congress) अनुसूचित जाती विभागाची कार्यशाळा शिर्डी (Shirdi) येथे सुरू आहे. या दोनदिवसीय ‘संविधान के राह पर’ राज्यस्तरीय (Maharashtra) प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते.

Mukul Wasnik
Nitin Pawar News : गैरप्रकार करून धनगर समाजाला आदिवासींमध्ये आरक्षण देऊ नये!

मुकुल वासनिक म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशातून आलेल्या पाहुण्यांना राजघाटावर घेऊन महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यासाठी जातात. पण एकीकडे देशांमध्ये धार्मिक, जातीय द्वेष निर्माण करण्याची भूमिका घ्यायची व दुसऱ्या बाजूला ज्या महात्मा गांधींनी अहिंसेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. ते करताना कुठल्याही शस्त्राचा, जातिधर्माचा वापर न करता देश एकसंध केल्याचे सांगायचे, ही द्विधा भूमिका घेऊन पंतप्रधान जनतेला किती काळ फसवू शकतील.

खासदार वासनिक यांनी काँग्रेसमुळेच संविधानांच्या निमित्ताने देशातील सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व राजकीय स्वातंत्र्य उपेक्षित घटकांना मूलभूत अधिकार प्राप्त झाल्याचे सांगितले. देशात तो काळ संपूर्ण काँग्रेसमय होता.

ते म्हणाले, की काँग्रेसचा प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्ता भाजप आणि आरएसएसच्या विरोधात संघर्ष करील, पण राज्याच्या नोकरीतील आरक्षण संपवू पाहणाऱ्या शिंदे - फडणवीस यांना रस्त्यावर उतरून विरोध करेल. आगामी काळात राज्याराज्यांत संविधानरक्षक निर्माण करून संघटना मजबूत करावी. हा विचार गावागावांत फिरून पोचवण्याचे आवाहन केले.

Mukul Wasnik
NDA -BJP News : ‘भाजप’ सोबत जाणाऱ्या देवेगौडांना दणका; मालेगावला पक्ष विसर्जित?

या वेळी सिद्धार्थ हत्तीअंबीरे, राष्ट्रीय काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष राजेश लिलोटीया, आमदार लहू कानडे, संजय राठोड, प्रशांत ओगले, ज्ञानेश्वर काळे, कैलास शिरसाट, भिवसेन साळवे, निवृत्ती गायकवाड, रमेश पाचुर्णे आदींसह राज्यभरातील कार्यकर्ते उपस्थित होते.

Mukul Wasnik
NCP Minister Upset : राष्ट्रवादीचे मंत्री अस्वस्थ?; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com