Uday Samant
Uday Samant Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Uday Samant: संभाजी महाराजांबाबत जे झालं ती गद्दारी नाही का?

Sampat Devgire

मुंबई : आम्हाला गद्दार (Traitor) म्हटले जाते. असे असेल तर राज्यसभा (Rajyasabha Election) निवडणुकीत छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhajiraje) यांना उमेदवारी देण्याच्या चर्चेच्या वेळी त्यांनी ऐनवेळी शिवसेनेत (Shivsena) प्रवेश करण्यास सांगण्यात आले. संभाजीराजेंसोबत झालेला प्रकार ही त्यांच्यासोबत गद्दारी (Traiting) नाही आहे का?, असा प्रश्न एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. (Minister Uday Samant claims, on the time told Chhatrapati Sambhaji Maharaj to joine Shivsena)

मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, हा प्रसंग यासाठी सांगितला की, आम्हाला गद्दार म्हटलं जातंय मग संभाजीराजेंना कोणी फसवलं. गद्दार या शब्दाची व्याख्या काय?.

छत्रपती संभाजीराजेंनी वारंवार एक कॅबिनेट मंत्री असा उल्लेख केला होता. तो कॅबिनेट मंत्री मी होतो. यामध्ये काही बाबी होत्या म्हणून त्यांनी माझं नावं घेतलं नाही. शिवसेनेमध्ये प्रवेश करावा असं सांगण्यात आल्यानंतर त्यांनी सांगितलं होते कि, मी अपक्ष म्हणून उभा राहणार आहे.

उदय सामंत यांनी आपल्या शासकीय निवासस्थानाचा उल्लेख केला. ते म्हणाले, संभाजीराजे यांनी याच बंगल्यावर माझी भेट घेतली होती. दोन तास अगोदर संभाजीराजेंना पुरस्कृत करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर हॅाटेल ट्रायडेंट येथे गेल्यावर असं कळलं कि, संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, मात्र त्यांनी ते नाकारलं.

संभाजीराजेंना आयत्यावेळी सांगितली की, तुम्हाला शिवसेनेत यावं लागेल. संभाजीराजेंसाठी नियमावलीचा जो ड्राफ्ट लिहीलेला होता तो अजूनही माझ्याकडे आहे. पन्नास आमदारांतील प्रत्येकाकडे असे अनेक विषय आहेत.

ते पुढे म्हणाले, आमच्याकडे देखील असे लोक आहेत. आम्ही देखील नव्वाद हजार मतांनी निवडून आलो आहोत. पण आम्हाला राजकारण करायचे नाही. ज्या दिवशी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली तेव्हापासून डीवचलं जातंय. ब्रिगेडीयर सुधीर सावंत हे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा द्यायला येत आहेत. आज सकाळी त्यांनी हा निर्णय घेऊन समर्थन करणार असल्याचे सांगितले.

मंत्री सामंत म्हणाले, आमच्याबाबत अनेक शब्द प्रयोग केले जातायत पण त्याचे अर्थ मलाही कळतं नाहीत. मी झालो पण प्रत्येक आमदाराकडे असे अनेक किस्से आहेत. त्यांनी असे किस्से सांगत बसायचं का?. जी वागणूक संभाजीराजेंना दिली ती अयोग्य आहे असे महाराष्ट्र सांगेल. संभाजी राजेंचा मोठेपणा होता कि, त्यांनी नियमावली नाकारली. जे नियम सर्वसामान्य शिवसैनिकांकडून लिहून घेतले जात नाही, ते संभाजीराजेंकडून लिहून घेतले जात होते. विधानभवनात जे शब्द प्रयोग केले जात आहेत, त्याचा अर्थ देखील माहीत नाही.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT