शहा,नड्डांनी दिल्या चंद्रशेखर बावनकुळेंना 'टिप्स'

Chandrashekhar Bawankule : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर चर्चा झाल्याची शक्यता आहे.
Chandrashekhar Bawankule, J.P Nadda, Ammit Shah
Chandrashekhar Bawankule, J.P Nadda, Ammit ShahSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीचे (BJP) नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (CHANDRASHEKHAR BAVANKULE ) यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (AMIT SHAH ) भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा (J P NADDA), भाजपा राष्ट्रीय संघटनमंत्री बी. एल. संतोष यांच्यासह इतरही नेत्यांची बुधवारी(ता.२४ ऑगस्ट) नवी दिल्ली येथे भेट घेतली.

या भेटीमध्ये महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर चर्चा झाल्याची शक्यता आहे. गुरूवारी घटनापीठासमोर महाराष्ट्रातील सत्तापेचावर सुनावनी आहे. या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. (Chandrashekhar Bawankule Latest NEWS)

Chandrashekhar Bawankule, J.P Nadda, Ammit Shah
माझ्या तक्रारीची दखल न घेतल्यास...आशिष शेलारांचा मुंबई पालिका आयुक्तांना इशारा

बावनकुळे हे प्रदेशाध्यक्ष झाल्यावर पहिल्यांदाच दिल्लीला गेले होते. या भेटीत त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांनी बावनकुळेंनी पक्षाची संघटनात्मक बांधणी आणि अन्य महत्त्वाच्या विषयांबद्दलही मार्गदर्शन केले. बावनकुळे यांनी नड्डा यांची सदिच्छा भेट घेतली. नड्डा यांनी बावनकुळे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर झालेल्या या पहिल्या भेटीमध्ये राज्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींविषयी चर्चा झाली व त्यांना मार्गदर्शन केले.

याबरोबरच बावनकुळे यांनी नवी दिल्ली येथे भाजप राष्ट्रीय संघटनमंत्री बी. एल. संतोष, केंद्रीय व्यापारमंत्री पीयूष गोयल, केंद्रीय कामगारमंत्री भूपेंद्र यादव, केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री मा. रावसाहेब पाटील दानवे आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची सदिच्छा भेट घेतली.

Chandrashekhar Bawankule, J.P Nadda, Ammit Shah
शिंदे गटाकडून अनिल राठोडांचे शिवालय हायजॅक : 'अमृत'साठी 500 कोटींचा निधी आणणार?

दरम्यान, शिवसेनेसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर महाराष्ट्रात सत्तांतर झालं. आता एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली राज्यात नव्या सरकारची स्थापना झाली असून या नव्या मंत्रिमंडळात माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यामुळे प्रदेशाध्यक्ष पदाची माळ ही बावनकुळेंच्या गळ्यात पडली आहे. महाविकास आघाडीच सरकार कोसळल्याने आणि शिवसेनेला मोठ खिंडार पडल्याने विरोधक चिडलेले असून आक्रमक झाले आहेत. याबरोबरच काही दिवसांवर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर बावनकुळे आणि पक्षश्रेष्ठींच्या या भेटीला महत्व प्राप्त झालं आहे. या भेटीत शहा, नड्डा यांनी काय मार्गदर्शन केलं असेल यावर चर्चा होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com