Raju Shetty Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Raju Shetti On Tomato Price: दर पाडण्याचा अधिकार सरकारला कोणी दिला?

Sampat Devgire

Raju Shetty On Tomato Price issue : शेतीमालाचे दर नियंत्रणात आणण्याचा सरकारला कुठलाही अधिकार नाही. दोन महिन्यापूर्वी टोमॅटोचे दर पडल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकले. त्यावेळी जर सरकारने टोमॅटो खरेदी करून आधार दिला असता, तर दर नियंत्रणात आणण्याचा नैतिक अधिकार राहिला असता, या शब्दांत स्वाभामानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारची कानउघडणी केली आहे. (Does the government get a toothache when farmers throws away the tomatoes?)

राज्य (Maharashtra) आणि केंद्रातील सरकारने कायमच शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. विशेषतः जेव्हा शेतकरी अडचणीत असतो तेव्हा सरकार, मंत्री सगळेच गप्प असतात, असे शेट्टी (Raju Shetty) यांनी नाशिक (Nashik) येथे सांगितले.

ग्राहकांसाठी सरकार टोमॅटो खरेदीसाठी बाजारात उतरले. मात्र अशा पद्धतीने टोमॅटोचे दर पाडण्याचा अधिकार सरकारला कोणी दिला?, असा सवाल त्यांनी केला. ते म्हणाले, शेतमालाचे दर पडतात तेव्हा सरकार झोपा काढत का?. टोमॅटो महाग झाला म्हणून कोणी मरत नाही.त्यास पर्यायी भाजीपाला ग्राहकांनी खरेदी करावा. ज्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी ५० पैसे,एक रुपये प्रति किलो टोमॅटो विकला.त्याचा ग्राहकांनी सुद्धा विचार केला आहे, असे परखड मत यावेळी त्यांनी मांडले.

राज्यात अनेक पक्ष शेतकऱ्यांच्या बाबतीत भुलभुलय्या करत आहे. दहा वर्षांपूर्वी काही लोक गुजरात पॅटर्न घेऊन राज्यात आले होते. त्यांनी शेतमालाच्या उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची घोषणा केली. २०२२ पर्यंत उत्पन्न दुप्पट करण्याचे सांगितले. मात्र तो भुलभुलय्या ठरला.

याप्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे,ज्येष्ठ नेते साहेबराव मोरे, कुबेर जाधव आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT