Eknath Khadse, Girish Mahajan sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

आमदार गुडघ्याला बाशिंग बांधून बसले पण मंत्रिमंडळ विस्तार कधी ? ; खडसेंचा टोला

Eknath Khadse : गिरीश महाजन यांनी राज्यातील एक हजार कोटींची कामे रद्द केली त्यामुळे सर्व पक्षीय आमदार नाराज आहेत

सरकारनामा ब्युरो

जळगांव : "मंत्रिमंडळ विस्तारासाठी शिंदे फडणवीस गटातील आमदार गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत, त्यामुळेच त्यांची अस्वस्थता आता बाहेर पडत आहे," असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse)यांनी केला आहे. जळगाव येथे पत्रकारांशी ते बोलत होते.(Eknath Khadse latest news)

एकनाथ खडसे म्हणाले, "मंत्रिमंडळ विस्तार लवकर होईल,आपली मंत्रिमंडळात वर्णी लागेल, अशी अपेक्षा शिंदें फडणवीस सरकार मधील सर्व आमदारांची आहे, मात्र विस्तार लांबत असल्याने आपली संधी जाते की काय या विचाराने त्यांची अस्वस्थता वाढत असून ती आता बाहेर पडू लागली आहे. सरकार मधील ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी राज्यातील एक हजार कोटींची कामे रद्द केली त्यामुळे सर्व पक्षीय आमदार नाराज आहेत,"

भुसावळ येथील नगरपालिकेचे नगरसेवक अपात्र ठरविण्याबाबत नगरविकास विभागाने दिलेल्या निर्णयाबाबत बोलतांना ते म्हणाले, "जिल्हाधिकारी यांनी राजकीय दबावाखाली नगरसेवकांवर आपत्रतेची कारवाई केली, तर मुख्यमंत्री यांनी आमच्या अपेक्षेप्रमाणे निर्णय दिला, ते आमच्या बाजूने निर्णय देतील, असे आम्हाला कधीच वाटले नव्हते, आणि तेच झाले असा खोचक टोलाही त्यांनी लगावला, मात्र या निर्णयाविरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहोत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT