Bhaskar Jadhav यांना शोधून आणा, अकरा रुपयांचे बक्षीस मिळवा !

Bhaskar Jadhav : भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) हे अधिक आक्रमकपणे शिंदे गट आणि भाजपावर टीका करीत आहेत.
Bhaskar Jadhav
Bhaskar Jadhav sarkarnama

मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपाने (BJP) माघार घेतल्यानंतर ठाकरे गटाकडून भाजपवर जोरदार टीका सुरू आहे. शिवसेना (Shiv sena) उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) हे अधिक आक्रमकपणे शिंदे गट आणि भाजपावर टीका करीत आहेत. आता भाजपाकडून भास्कर जाधव यांच्या टीकेला हटके अनोख्या पद्धतीने उत्तर देण्यात आले आहे. (bhaskar jadhav latest news)

"आपण यांना पाहिलंत का ? शोधून आणणाऱ्यास अकरा रुपयांचे बक्षीस...!' अशा आशयाचे बॅनर शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या विरोधात बुधवारी रात्री मुंबईतील माहीम परिसरात लावण्यात आले होते. मात्र कायदा-सुव्यवस्था चा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाने रात्रीचे हे बॅनर हटवले.

दोनच दिवसांपूर्वी शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधील घरावर अज्ञात इसमांनी हल्ला केल्याचे प्रकरण घडले होते , त्या हल्ल्यात भारतीय जनता पार्टीचा हात असल्याचे भास्कर जाधव यांनी नमूद केले होते. त्या अनुषंगाने ही बॅनर बाजी भारतीय जनता पार्टीकडून तर केली नाही ना अशा प्रकारच्या राजकीय चर्चा आता रंगत आहेत.

शिवसेना नेते भास्कर जाधव हे माहीम मतदार संघातील आमदार नाहीत मात्र तरीही माहीम परिसरात अशा प्रकारचे बॅनर झळकावून एका अनोख्या पद्धतीने भास्कर जाधव यांच्यावर निशाणा साधण्यात आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव हे आपल्यावरील या टीकेला कशापद्धतीने उत्तर देतील हे पहाण महत्त्वाचं ठरणार आहे.

Bhaskar Jadhav
Gulabrao Patil : पाणी पुरवठामंत्री संतापले ; म्हणाले, "आकाशातून पाणी देवू का...?

शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. आम्ही संवेदनशीलता म्हणून अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून माघार घेतली. मात्र ते आम्हाला पळपुटे म्हणत आहेत. आम्ही मुंबई महापालिका निवडणुकीत दाखवून देऊ खरं पळपुटं कोण आहे ते असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com