Abdul Sattar news : Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar news: शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी मिळणार? अब्दुल सत्तारांनी दिले उत्तर

Abdul Sattar news : राज्यातील अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नंदुरबारसह राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

सरकारनामा ब्युरो

Abdul Sattar Comments on Unseasonal rain : राज्यातील अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नंदुरबारसह राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पण एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही. येत्या दोन दिवसांत युद्धपातळीवर पंचनामा करून योग्य ती नुकसान भरपाई जाहीर केली जाईल, अशी ग्वाही राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.

अब्दुल सत्तार यांनी नुकतीच नंदुरबार जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. या पाहणीनंतर ते बोलत होते. आतापर्यंत झालेल्या पंचनाम्यानुसार ३६०० पेक्षा अधिक क्षेत्रावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कांदा, गहू, बाजरी, पपई, कलिंगड या फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

ही परिस्थिती पाहता, प्रत्येक नुकसान ग्रस्त शेतकऱ्याला सर्वतोपरी मदत देण्याची भूमिका राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतीलआहे. त्यासाठी हंगामातच झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन पिकानुसार समाधानकारक भरपाई देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे अब्दुल सत्तार यांनी सांगितलं.

सुरुवातीला गारपीट आणि अवकाळी पावसामुळे १३ हजार हेक्टर, नंतर ४० हजार हेक्टर आणि सध्या सुमारे १ लाख ३९ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचेही सत्तार यांनी सांगितले. तसेच नंदुरबार जिल्ह्यातील धुलिया येथे सरकारी कर्मचार्‍यांनी संप आंदोलन काळातही शेतकर्‍यांच्या नुकसानीचे पंचनामे केल्याची सकारात्मक वस्तुस्थिती शेतकर्‍यांनीच त्यांना सांगितली, असे सांगत त्यांनी कर्मचार्‍यांचे कौतुक करून केलं.

तसेच, नंदुरबारचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी प्रशासनाला यापूर्वीच आदेश दिले असून पंचनामा केल्यानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री विधान परिषद व विधानसभेत शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन भरपाई जाहीर करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT