Eknath-shinde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Shinde Politics: शिवसेनेच्या नगरसेवकांची खेळी यशस्वी; मात्र एकनाथ शिंदे यांनी टोचले कान!

When will the growing discontent among corporators of Nashik NMC Shiv Sena Eknath Shinde's party stop?-नाशिक महापालिकेतील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील पदांसाठीची गटबाजी थांबण्याची चिन्हे नाहीत

Sampat Devgire

Nashik Shiv Sena News: नाशिक महापालिकेत शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष सत्तेत सहभागी झाला आहे. त्यामुळे पक्षातील प्रस्थापित पदाधिकारी आनंदात आहे. मात्र हा आनंद किती काळ टिकणार यावर खलबत्ते सुरू झाली आहेत.  

नाशिक महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवली. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या या राजकीय खेळीला यश आले. पक्षाचे ७२ नगरसेवक निवडून आले.

स्वबळावर सत्तेत आलेल्या भाजपने सत्ता स्थापन करताना राजकीय सोय म्हणून महायुतीचा विचार केला. त्यामुळे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला सत्तेत सहभागी होण्याची संधी मिळाली. विलास शिंदे यांना महापौरपदाची संधी मिळाली. 

शिवसेना शिंदे पक्षाच्या शिंदे यांना उपमहापौर पदाची संधी मिळाल्याने पक्षात वादाची ठिणगी पडली. पक्षाचे महानगरप्रमुख बंटी तिदमे यांसह सुवर्णा मटाले, राहुल दिवे या इच्छुकांची निराशा झाली. त्यामुळे संधी हुकलेले नगरसेवक आणि त्यांचे समर्थक नाराज झाले. 

शिवसेना एकनाथ शिंदे पक्षातील ही नाराजी आता नेत्यांसाठी डोकेदुखी बनली आहे. बंटी तिदमे यांनी आपली खदखद जाहीरपणे व्यक्त केली. त्यांच्या समर्थक नगरसेवकांनी थेट पदाधिकाऱ्यांना आव्हान दिले होते. त्यामुळे हा राजकीय वाद थेट पक्ष प्रमुखांपर्यंत पोहोचला. 

नगरसेवकांनी नाराजी व्यक्त करून केलेली खेळी काही प्रमाणात यशस्वी झाली आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नाराजीची दखल घेत ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिकेचा पॅटर्न नाशिकला राबविण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे ज्यांना पदे मिळाली त्याचा कालावधी सव्वा वर्ष करण्यात आला आहे. त्यामुळे बंटी तिदमे आणि नाराज नगरसेवकांचा हेतू यशस्वी झाला आहे. 

मुंबईत उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीची माहिती संपर्क नेते राम रेपाळे यांनी दिली. अर्थात या बैठकीत नाराज नगरसेवकांना शिंदे यांनी फटकारले. यावेळी पक्ष शिस्तीचे धडे देण्यात आले. पदासाठी वाद टाळून जनतेची कामे करा, या शब्दात समाज देण्यात आली.

नाशिक महापालिकेत सत्तेत सहभागी झालेल्या शिंदेंच्या नगरसेवकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने अन्य पक्षातून आलेल्यांचा समावेश आहे. निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश केलेल्या या नेत्यांच्या महत्त्वकांक्षा लपून राहिलेल्या नव्हत्या. किंबहुना या महत्त्वाकांक्षेला हवा देऊनच शिवसेना शिंदे पक्षाने पक्षप्रवेशाचे राजकारण खेळले होते.

आता मात्र या महत्वकांक्षा गटबाजीची बीजे रोवण्यास कारणीभूत ठरली आहे. त्यामुळे आगामी काळात या गटबाजीवर काय तोडगा काढला जातो हा उत्सुकतेचा विषय आहे. पक्षनेत्यांसाठी ती मोठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT