Ajit Pawar Plane Crash 2026: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत राजकीय चर्चा होत आहे. यासंदर्भात येणाऱ्या बातम्यांवर राज्य सरकारने प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र आता सरकारमधील एका मंत्र्यानेच यावर भाष्य केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या काही नेत्यांचा त्यांनी उल्लेख केला होता. या अपघाताबाबत काही गंभीर प्रश्न उपस्थित केले होते.
आमदार रोहित पवार यांच्या प्रश्नांवर राज्य शासनाने कोणतीही प्रतिक्रिया देण्याचे टाळले. मात्र शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे मंत्री संजय शिरसाट यांनी यावर भाष्य केले आहे. त्यामुळे राज्य सरकारला घरचा आहेर मिळाला, अशी स्थिती आहे.
मंत्री संजय शिरसाठ म्हणाले, आमदार पवार यांनी काय प्रश्न उपस्थित केले हे महत्त्वाचे नाही. त्याबाबत शंका घेण्याचे काहीही कारण नाही. मात्र या संदर्भात रोज नव्हे पुरावे समोर येत आहेत. त्यामुळे त्याचे गांभिर्य वाढत आहे.
उपमुख्यमंत्र्यांच्या विमान अपघाताची चर्चा सर्व स्तरावर होते. त्याबाबत विविध शंका उपस्थित केल्या जातात. या शंकांचे निरसन होणे गरजेचे आहे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
या अपघाताची होणारी चर्चा विचारात घेता उच्चस्तरीय चौकशी आवश्यक वाटते. केंद्रातील सीबीआय अथवा तत्सम यंत्रणेने ही चौकशी करावी. तशी चौकशी झाली पाहिजे, असे ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बारामती येथे अपघात झाला होता. त्यामध्ये उपमुख्यमंत्र्यांसह पाच जणांचा मृत्यू झाला. त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नेत्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. सरकारही या विषयावर मौन आहे. मात्र सरकारमधील मंत्र्यानेच यावर भाष्य करून नव्या चर्चेला तोंड फोडले आहे. त्यामुळे तो चर्चेचा विषय आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.