CM Eknath Shinde & Dy. CM Devendra Fadanvis Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP & Shinde Group News: एकनाथ शिंदे गट भाजपमध्ये विलीन होईल का?

Whether Eknath Shinde Group will merge with BJP- भाजप नेत्यांच्या बंदद्वारच्या बैठका आणि प्रदेशाध्यक्षांच्या सूचक वक्तव्याने खळबळ

Sampat Devgire

Eknath Shinde Group Politics : मुख्यमंत्र्यांसह १६ आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दोन आठवड्यांची मुदत दिली आहे. त्यानंतर भाजपमधील राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. यासंदर्भातील कायदेशीर पेच लक्षात घेता शिंदे गट भाजपमध्ये विलीन होऊन आपली सुटका करून घेईल का? अशी चर्चा सुरू झाली आहे. (On the ground of 16 MLA disqualification case it may take new political turn)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह सोळा आमदारांच्या अपात्रतेविषयी शिवसेनेने (Shivsena) याचिका दाखल केली आहे. याबाबत विधानसभेच्या अध्यक्षांना (BJP) यावर निर्णय घ्यावा लागेल असे दिसते.

भारतीय जनता पक्षाने सध्या आपला सर्व फोकस लोकसभा निवडणुकांवर केंद्रित केला आहे. त्यासाठी त्यांचा महाराष्ट्रात ४५ प्लस हा नारा आहे. मात्र, ग्राउंड रिपोर्ट काही वेगळेच सूचित करीत असल्याने भाजपचे नेते अस्वस्थ आहेत. त्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यापासून तर अनेक नेते सातत्याने महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत.

या पार्श्वभूमीवर नाशिकच्या दौऱ्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघ कोणाला? या वादावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र व कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवतील, असे सूचक वक्तव्य केले आहे.

बावनकुळे यांच्या वक्तव्याने राजकीय कार्यकर्त्यांत खळबळ उडाली आहे. खासदार शिंदे जर भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढणार असतील, तर त्यांचा गट जो, खरी शिवसेना आम्हीच असा दावा करत आला आहे, त्याचे भाजपमध्ये विलीनीकरण होईल. अपात्रतेच्या संकटातून वाचण्याचा तो एक कायदेशीर मार्ग आहे. त्यामुळे सोळा आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा दबाव आणि आपात्रतेची टांगती तलवार यातून सुटका करण्यासाठी एकनाथ शिंदे गट भाजपमध्ये विलीन होईल का, याची चर्चा वेग घेऊ लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT