Piyush Goyal News: पीयूष गोयल यांनी अजित पवारांचे म्हणणे धुडकावले?

Piyush Goyal`s meeting with Dy. CM Ajit Pawar & other ministers unfruitfull- स्वतःच निर्यातकर लावणारे पीयूष गोयल यांनी कर हटविण्यासाठी आणखी एक बैठक घेण्याची घोषणा केली.
Centre Minister Piyush Goyal, Ajit Pawar & Other Ministers
Centre Minister Piyush Goyal, Ajit Pawar & Other MinistersSarkarnama
Published on
Updated on

Onion traders meeting with Centre : कांदा निर्यात रद्द करावी, यांसह विविध मागण्यासांठी कांदा व्यापाऱ्यांनी लिलाव बंद केले आहेत. नाशिकसाठीच्या या गंभीर प्रश्नावर विविध मंत्र्यांनी बैठका घेतल्या. काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक घेतली. त्यानंतर सायंकाळी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनीही बैठक घेतली. मात्र, निर्णय काहीच झाला नाही. (There was no dicision on onion export duty in meetings)

केंद्रीय मंत्री (Centre Government)पीयूष गोयल व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह विविध मंत्र्यांनी बैठकीत भाग घेतला. मात्र, कांदा (Farmers) व्यापाऱ्यांच्या बंदबाबत काहीही तोडगा निघाला नाही.

Centre Minister Piyush Goyal, Ajit Pawar & Other Ministers
Nashik Onion Issue: कांद्याच्या प्रश्नात दोन्ही पवारांची उडी; अजितदादांची बैठक तर शरद पवारांची 'ही' मागणी

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात नाफेड आणि 'एनसीसीएफ' यांनी थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करावी, अशी लोकप्रतिनिधींनी मागणी केली आहे. ही मागणी सध्याच्या कांदा व्यापाऱ्यांच्या मागणीशी मेळ खाणारी नाही. तसेच निर्यातशुल्कावर तोडगादेखील नाही. त्यामुळे राज्यातील मंत्रीही शेतकऱ्यांच्या, कांदा व्यापाऱ्यांच्या बाजूने निर्णय घेण्यात यशस्वी होऊ शकले नाही. असे चित्र आहे.

यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी दिल्ली येथे २९ सप्टेंबरला आणखी एक बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी दिली. दिल्ली येथील बैठकीस राज्य मंत्रिमंडळ सदस्यांचे शिष्टमंडळ उपस्थित राहील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. कांदा उत्पादक शेतकरी, व्यापाऱ्यांसह ग्राहकवर्गाच्याही हिताचे रक्षण करण्याचा राज्य शासनाचा सर्वतोपरी प्रयत्न आहे, असे सूचक वक्तव्य या वेळी मंत्र्यांनी केले. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आणि ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी लिलाव बंदीचा निर्णय मागे घेऊन तातडीने कांदा खरेदी सुरू करावी, असे आवाहन गोयल, उपमुख्यमंत्री पवार यांच्यासह उपस्थितांनी केले.

कांदा उत्पादक शेतकरी, व्यापाऱ्यांसह ग्राहकवर्गाच्याही हिताचे रक्षण करण्याचा राज्य शासनाचा सर्वतोपरी प्रयत्न आहे, असे सूचक वक्तव्य या वेळी मंत्र्यांनी केले. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आणि ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी लिलाव बंदीचा निर्णय मागे घेऊन तातडीने कांदा खरेदी सुरू करावी, असे आवाहन गोयल, उपमुख्यमंत्री पवार यांच्यासह उपस्थितांनी केले.

Centre Minister Piyush Goyal, Ajit Pawar & Other Ministers
Sharad Pawar News : शरद पवारांना मोठा धक्का; 'या' निवडणुकीत पॅनेलचा पराभव

नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी पुकारलेला बंदच्या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासंदर्भात केंद्रीय मंत्री पीयूष गोयल व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज सायंकाळी मुंबईतील सह्याद्री शासकीय अतिथिगृह येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री धनंजय मुंडे, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे, पणनमंत्री अब्दुल सत्तार, आमदार सर्वश्री हिरामण खोसकर, राहुल आहेर, नितीन पवार, दिलीप बनकर, अॅड. माणिकराव कोकाटे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, सहकार व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिष शर्मा, कृषी आयुक्त सुनील चव्हाण (व्हीसीद्वारे), नाशिक जिल्हाधिकारी जलज शर्मा (व्हीसीद्वारे) आदी या बैठकीत सहभागी झाले होते.

Centre Minister Piyush Goyal, Ajit Pawar & Other Ministers
BJP Nashik News : उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्याला पवार, ठाकरेंचे समर्थन आहे काय?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com