Uddhav Thackerey & Prakash Ambedkar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

`वंचिंत`शी युती की आघाडी ते शिवसेनेने स्पष्ट करावे

वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी शिवसेना नेत्यांना प्रश्न केला आहे.

Sampat Devgire

नाशिक : शिवसेना (Shivsena) व वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) यांच्यामध्ये युती होणार असल्याच्या बातम्या सध्या वाऱ्यासारखी पसरत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) व वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा डॉ. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यात बैठक होऊन सकारात्मक चर्चा झाल्याचे बोलले जाते. (Vanchit leaders confused on shivsena alliance)

याबाबत शिवसेना व वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये द्विधा अवस्था बघायला मिळत आहे. शिवसेना युती करणार की आघाडीत घेणार हे स्पष्ट करावे, असे निवेदन वंचितच्या प्रदेश अध्यक्ष रेखा ठाकूर यांनी शिवसेनेला केल्याने पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

वंचित बहुजन आघाडीची शिवसेना सोबत युती किंवा आघाडी करण्याबद्दल चर्चा सुरू आहे. याबाबतीत वंचित बहुजन आघाडीने होकार कळवला आहे. पक्षाचे राज्य कमिटीचे सदस्य महेंद्र रोकडे, मुंबई प्रदेश अध्यक्ष अबुल हसन व वंचित बहुजन युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नीलेश विश्वकर्मा यांची शिवसेनेचे नेते व माजी मंत्री सुभाष देसाई तसेच त्यांचे काही खासदार यांच्याबरोबर दोन बैठकादेखील झाल्या आहेत.

या बैठकांत युती संबंधी सकारात्मक चर्चा झाली. शिवसेना नेते सुभाष देसाई हे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना येऊन भेटले. त्यांच्यातही दोन बैठका झाल्या असून, युती संबंधी सकारात्मक चर्चा झाली आहे. सध्या या टप्प्यांवर बोलणी झाली आहे. शिवसेनेला हे स्पष्ट करण्यास सांगितले आहे की, वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीचा भाग बनविणार, चार पक्ष आघाडी करून निवडणूक लढवणार की, शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी हे मिळून निवडणुका लढवणार हे स्पष्ट करायला सांगण्यात आले आहे.

या बाबतीतला निर्णय शिवसेनेकडून समजताच पुढच्या टप्प्याची चर्चा सुरु होणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्याच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले असल्याची माहिती नाशिक महानगर अध्यक्ष अविनाश शिंदे यांनी सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT