Uddhav Thackrey & CM Eknath Shinde  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shivsena News; `कोणते` दहा नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर आहेत?

नाशिकच्या राजकारणात अफवांचे पीक जोमात असल्याने पक्षांतराच्या चर्चा थांबेनात.

Sampat Devgire

नाशिक : मागील आठवड्यात (NMC) १३ माजी नगरसेवकांनी शिवसेनेला (Shivsena) जय महाराष्ट्र करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात (Eknath Shinde) प्रवेश केला. त्यानंतर आता पुन्हा शिवसेना ठाकरे गटाचे (Uddhav Thackrey) दहा माजी नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा पसरली आहे. त्यात किती तत्थ्य व वास्तव हे गुलदस्त्यातचआहे. मात्र नागपूरच्या (Nagpur) चालू हिवाळी अधिवेशनातच प्रवेशाचा कार्यक्रम आटोपण्याची तयारी करण्यात आल्याचे बोलले जाते. त्यामुळे शिवसेना नेते सावध झाले आहेत. (Shivsena leaders confused on corporators to join Shinde Group)

नाशिकसह महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेते, कार्यकर्त्यांत अफवा पसरवून त्यांना नाऊमेद करण्याचे प्रयत्न अगदी पद्धतशीर सुरु आहेत. त्यात जेव्हढी फुट-तूट होईल त्यात अंतिमत: भाजपचा फायदा आहे. त्यामुळे रोज या प्रकारच्या नव्या अफवांना जन्म दिला जात आहे. आता दहा नगरसेवक शिंदे गटात जाणार अशी चर्चा होत आहे. नागपुर अधिवेशन शेवटच्या टप्प्यात असल्याने ते शक्य होईल का याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहे.

राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर शिंदे गटाकडून शिवसेनेला संघटना पातळीवर झटके देण्याची प्रयत्न वारंवार होत आहे. जून महिन्यात सरकार स्थापन झाल्यानंतर शिंदे गटाला नाशिकमध्ये फारसे यश मिळाले नाही. पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे व नांदगावचे आमदार सुहास कांदे यांच्या व्यतिरिक्त दमदार असे नेतृत्व शिंदे गटात सहभागी झाले नाही.

मागील आठवड्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत जवळपास १३ माजी नगरसेवकांनी शिंदे गटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला. माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्यासह सुदाम डेमसे, सुवर्णा मटाले, रमेश धोंगडे, सूर्यकांत लवटे, ज्योती खोले, चंद्रकांत खाडे, पुनम मोगरे, संगीता जाधव, अमोल जाधव, प्रताप मेहरोलीया, यांनी प्रवेश केल्यानंतर शिवसेनेसाठी मोठा झटका मानला जात आहे.

या राजकीय झटक्यातून शिवसेना सावरत नाही तोच ज्यांच्याकडे संघटना बळकट करण्याची जबाबदारी होती, ते संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी हेदेखील नागपूरमध्ये शिंदे गटात सहभागी झाले. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची ताकद शहरात खच्ची होत असताना दुसरीकडे शिंदे गटाची ताकद मात्र वाढताना दिसत आहे. विकासकामांसाठी निधी व दमदार नेत्यांचा शिंदे गटाकडे कल वाढल्याच्या पार्श्वभूमीवर आणखीन दहा नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात आले आहे.

अधिवेशन काळातच होणार प्रवेश?

नागपूरला राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशन काळातच दहा माजी नगरसेवकांचे प्रवेश होणार असल्याची माहिती समोर येत आहे. यात सिडकोतील तीन, नाशिक रोड विभागातील दोन, सातपूर विभागातील एका, नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील दोन माजी नगरसेवकांचा समावेश असल्याचे समजते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT