Praniti Shinde 1.jpg Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Praniti Shinde : इथं महिलाच सुरक्षित नाही, महिला मुख्यमंत्री दूरची चर्चा; प्रणिती शिंदे असं का म्हणाल्या?

Praniti Shinde criticism of the mahayuti BJP on the increasing oppression of women : खासदार प्रणिती शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर दौऱ्यावर असताना राज्यात महिलांवरील वाढत्या अत्याचारावरून महायुती भाजप सरकारच्या मानसिकतेवर प्रहार केले.

Pradeep Pendhare

Ahmednagar News : काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी महिला मुख्यमंत्री पदावरून राज्यातील महायुती सरकारवर निशाणा साधला.

"गुजरातमध्ये बलात्कार करणाऱ्यांचा स्वातंत्र्यदिनी सत्कार केला जातो. एवढी विकृत मानसिकता असणारे सत्तेत आहेत, यांच्याबद्दल काय म्हणावं? आम्ही काहीही करू शकतो, ही मानसिकता या सरकारची तयार झालीय. राज्यात अगोदर महिला सुरक्षित ठेवा. नंतर पुढचं पाहू. महिला मुख्यमंत्री ही तर खूपच दूरची चर्चा आहे", असा टोला प्रणिती शिंदे यांनी महायुती सरकारला लगावला.

काँग्रेस (Congress) खासदार प्रणिती शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर दौऱ्यावर होत्या. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाऱ्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले. अत्याचाराविरोधात लगेच कारवाई होत नाही. लोकांना रस्त्यावर उतरावे लागलेत. पोलिस दबावाखाली काम करत आहेत. सरकारचा नेमका प्लॅन काय? असा प्रश्न प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा उभारणीच्या काम भ्रष्टाचार करू शकतात, त्यांच्याबाबत काय बोलावं, भ्रष्टाचार हा शिष्टाचार या महायुती सरकारमध्ये झाला आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा खूप निकृष्ट दर्जाचा बनवला होता. प्रतागडावरील शिवाजी महाराजांचा पुतळा अजूनही मजबूत आहे, याकडे प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी लक्ष वेधले.

महाविकास आघाडी एकसंघ आहे. महाराष्ट्राबरोबर देशनिर्माणाचा विचार 'मविआ' करत आहे. भ्रष्टाचाराचे आरोप असलेले महायुती भाजपमध्ये गेले आहेत. त्यामुळे भ्रष्टाचाराला आणि भ्रष्टाचाऱ्यांना 'मविआ'मध्ये स्थान नाही. यातून महायुती भाजप सरकार घाबरली आहे. त्यामुळे राज्यातील निवडणुका पुढे ढकलत आहेत. सर्व्हेत महायुतीमधील तीनही पक्ष कुठेच दिस नाही. सरकारने दिखावा करत असून, जनतेच्या लक्षात आल्याने मविआ निडवणुकीत यशस्वी होईल, असा दावा प्रणिती शिंदे यांनी केला.

काहीही करू शकतो, ही सरकार मानसिकता

महिलांवरील वाढत्या अत्याचार रोखण्यासाठी महायुती सरकार ताकदीने काम करताना दिसत नाही. अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी या सरकारच्या काळात रस्त्यावर उतरावे लागते. पोलिसांवर दबाव आहे. यांचा नेमका प्लॅन काय? हा संशोधनाचा विषय आहे. गुजरातमध्ये बलात्काऱ्यांच्या स्वातंत्र दिनी सत्कार केला जातो. एवढी विकृत मानसिकता असणारे सत्तेत आहेत, यांच्या बद्दल काय म्हणावं? आम्ही काहीही करू शकतो, ही मानसिकता या सरकारची तयार झालीय, असा घणाघात प्रणिती शिंदे यांनी केला. तसंच जेंव्हा पुरुष महिलांवर होणाऱ्या अत्याचारांबद्दल बोलायला सुरवात करतील, तेव्हा महाराष्ट्रात परिवर्तन होईल,असंही प्रणिती शिंदे यांनी म्हटलं.

लोकसभेसारखं चित्र विधानसभा निवडणुकीला चित्र

मध्यप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. मात्र महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा आहे, हे महायुती सरकारला विसर पडला. महाराष्ट्राने काँग्रेसचे 14 खासदार लोकसभेत पाठवले. लोकसभेसारखं चित्र विधानसभा निवडणुकीत असेल, असा विश्वास प्रणिती शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT