Aditya Thackrey Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Aditya Thackerey: महाराष्ट्राचा खरा मुख्यमंत्री कोण? हे कोणालाच माहिती नाही

सगळं काही देऊनही आणदारांनी गद्दारी केली, त्यांनी निवडणुकांना सामोरे जाऊन दाखवावे.

Sampat Devgire

मुंबई : महाराष्ट्राचा (Maharashtra) खरा मुख्यमंत्री (Chief Minister) कोण हे कोणालाच माहिती नाही. कधी माईक खेचला जातो. कधी चिठ्ठी येते. कधी बोलायला परवानगी मागायला लागते. हे सगळं सगळ्यांना दिसते आहे. मुख्य म्हणजे आधी कोणाच्याही आदेशाची वाट पहायला लागत नव्हती. आता यांना दिल्लीश्र्वरांच्या आदेशाची वाट पहावी लागते, असा चिमटा शिवसेनेचे (Shivsena) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackrey) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना घेतला आहे. (Those MLA who Shivsena rebel are feeling they done mistake)

पावसाळी विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहाबाहेर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, आजच्या स्थितीवर राग नाही तर दुःख आहे की, आम्ही सगळं काही देऊनही आमच्या पाठीत खंजीर खुपसला. आम्ही हेच विचारतो आहोत की, आमचं काय चुकलं. या चाळीस गद्दारांवर काही दडपणं असतील. त्यांनी आनंदात तीथे रहावे, मात्र हिंमत दाखवून राजीनामा द्यावा आणि पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जावे. हीच महाराष्ट्राची राजकीय संस्कृती राहिलेली आहे. ज्यांना वाटत असेल परत यायचे आहे, त्यांच्यासाठी आमचे दरवाजे सदैव खुले असतील.

तिकडे जाऊन सगळ्यांचा मोठा गेम झाला आहे, असे त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. एकंदर मंत्रीमंडळ बनवायला ४१ दिवस लागले. त्यानंतर खातेवाटपासाठी आठ दिवस लागले. आणि जे आधी मंत्री होते, त्यांनाच मंत्री केले आहे. डाऊनग्रेड केले आहे. महत्त्वाचे म्हणजे, कुठेही महिलांचा आवाज, ना रायगडचा आवाज आहे. या मंत्रीमंडळात कोणाला स्थान नसताना हे जे खाते वाटप झाले आहे त्यात खुप असमतोल आहे.

ते म्हणाले, खरे मुख्यमंत्री कोण हे माहिती नाही. आज विधीमंडळाच्या पायऱ्यांवर जेव्हा आम्ही आंदोलन करीत होतो, तेव्हा ज्या चाळीस गद्दारांना आम्ही पहात होतो, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर असं दिसत होतो की, आम्ही शिवसेनेत होतो ते बरं होतं. एक दोन व्यक्तींच्या महत्वाकांक्षेने त्यांना फरपटत नेले होते. ज्यांना परत यायचे आहे, त्यांच्यासाठी शिवसेनेचे दरवाजे नेहेमी खुले असतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT