नाशिक : शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackray) यांच्या मुंबईच्या (Mumbai) शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्याला जशास तसे उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाकडून जोरदार तयारी सुरू आहे. त्या तयारीला बळ देण्यासाठी नाशिकमधून (Nashik) ३३७ बस व ४२४ वाहने मुंबईत नेली जाणार आहे. अर्थात एव्हढ्या वाहनांतून कोणते कार्यकर्ते जातील, याची मोठी उत्सुकता आहे. (Nashik unit claim that they have arrange 750 vehicles)
शिवसेनेतर्फे दरवर्षी परंपरेप्रमाणे पक्षप्रमुखांच्या उपस्थितीत मुंबईत शिवाजी पार्कवर समर्थकांचा मेळावा होतो. यंदा पक्षातून फुटलेल्या चाळीस आमदारांचे नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मेळाव्याला उत्तर म्हणून प्रतीमेळावा घेण्याचे जाहीर केले आहे. त्यासाठी प्रचंड रसद उपलब्ध करण्यात आल्याने तो चर्चेचा विषय आहे.
जून महिन्यात राज्यातील महाविकास आघाडी सरकार उलथून एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीने सरकार स्थापन केले. सरकार स्थापनेनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेना संघटनेवर हल्ला चढण्यास सुरवात केली. एवढेच नाही, तर शिवसेना हायजॅक करण्याचा प्रयत्न केला. अद्यापही न्यायालयात यासंदर्भात दावा दाखल आहे. मात्र, उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात रस्त्यावरची लढाई जोरदार सुरू आहे. दसरा मेळावा हा शिवसेनेचे वैशिष्ट्य. दसऱ्याला विचारांची सोने लुटण्यासाठी हजारो शिवसैनिक मुंबईत पोचतात. मात्र, यंदाचा दसरा मेळावा नेमका उद्धव ठाकरे यांचा की मुख्यमंत्री शिंदे यांचा यावरून वाद निर्माण झाला.
ऐतिहासिक दादरच्या शिवाजी पार्कवरचा दसरा मेळावा शिवसैनिकांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यामुळे या मैदानावर मेळावा घेण्याची तयारी उद्धव ठाकरे यांच्यासह शिंदे यांनी केली व न्यायालयात दावा दाखल केला, मात्र न्यायालयाने उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल दिला. त्यामुळे शिंदे यांचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होईल. उद्धव ठाकरे यांचा मेळावा जेवढ्या ताकदीचा होईल, तेवढ्याच ताकदीने किंवा त्यापेक्षा अधिक मोठ्या स्वरूपात मेळावा करण्याचे नियोजन शिंदे गटाकडून सुरू आहे. नाशिकमध्ये त्या संदर्भात दोन दिवसापूर्वी बैठक होऊन दसरा मेळाव्यासाठी अधिकाधिक कार्यकर्ते नेण्याचा निर्णय घेण्यात आला.
मंत्री, आमदारांची प्रतिष्ठा पणाला
नांदगाव तालुक्यातून १०० बस, मालेगाव तालुक्यातून ५० बस व १२५ वाहने, नाशिक शहरातून ३२ बस व नऊ चारचाकी वाहने, नाशिक तालुक्यातून पंधरा बस व १० चारचाकी वाहने, बागलाण तालुक्यातून ३० बस, येवला व चांदवड तालुक्यातून २५ बस, कळवण तालुक्यातून पाच बस व वीस खासगी वाहने असे प्रत्येक तालुक्यातून किती वाहने असतील याची यादीच शिंदे गटाने प्रसिद्धीत दिली आहे. त्यामुळे जिल्हाभरातून उपलब्ध केलेल्या ७५० वाहनांतून कोण मुंबईला जाणार याची चर्चा आहे.
...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.