Nashik Mayor Election 2026 Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Mayor 2026: महापौरपदासाठी आमदारांची लॉबिंग; गिरीश महाजनांनी बोलावली नगरसेवकांची तातडीची बैठक!

Girish Mahajan calls urgent meeting of Nashik BJP corporators: महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज दुपारी तीन वाजता शेवटची मुदत आहे. त्यादृष्टीने नगरसेवकांनी बैठकीनंतर दुपारी दोनला महापौर आणि उपमहापौर पदाचे नाव निश्चित होईल

Sampat Devgire

Candidates for Nashik Mayor post 2026 from BJP: नाशिक महापौर पदासाठी भाजपमध्ये जोरदार राजकीय हालचाली आहेत. आज दुपारपर्यंत नाव निश्चित करणे आवश्यक. त्यामुळे नगरसेवक आणि आमदारांची लॉबिंग सुरू आहे.

नाशिक महापौर पदासाठी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आज निश्चित होणार आहे. यामध्ये जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची प्रमुख भूमिका असेल. त्यामुळे नगरसेवक आणि आमदारांनी मुख्यमंत्री ते महाजन अशी लॉबिंग सुरू केली आहे.

या पार्श्वभूमीवर आज सकाळी अकरा वाजता नगरसेवकांची तातडीची बैठक बोलविण्यात आली आहे. गिरीश महाजन आणि शहरातील प्रमुख नेते यावेळी उपस्थित राहते. वरिष्ठ नेत्यांची चर्चा करून उमेदवार निश्चित झाला असल्याचे बोलले जाते. घोषणेची औपचारिकता म्हणून ही बैठक होत आहे.

भाजप पूर्ण बहुमतात असल्याने महापौर पदासाठी हिमगौरी अडके यांचे नाव आघाडीवर आहे. दिपाली कुलकर्णी, स्वाती भामरे आणि दिपाली मते या अन्य तीन इच्छुक आहेत. पक्षाकडे पूर्ण बहुमत असल्याने वेगळे नाव पुढे येण्याची शक्यता न करता येत नाही. त्या दृष्टीने इच्छुकांमध्ये अस्वस्थता आहे.

महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज दुपारी तीन वाजता शेवटची मुदत आहे. त्यादृष्टीने नगरसेवकांनी बैठकीनंतर दुपारी दोनला महापौर आणि उपमहापौर पदाचे नाव निश्चित होईल.

महापौर पदाच्या उमेदवारीसाठी चुरस आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी टाळल्या जाणाऱ्या उमेदवाराला उपमहापौर पदाचे लॉटरी लागू शकते. उपमहापौर पदासाठी भाजपकडे अनेकांचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचा एक भाग म्हणूनच स्थायी समिती सदस्यांची निवड तीन दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. भाजपचा अंतर्गत राजकारणाचा हा भाग आहे.

महापौरपदाच्या निवडणुकीत आमदारांच्या भूमिकेला महत्त्व आहे. विशेषतः पंचवटी भागातील इच्छुकांना आमदारांचा विरोध आहे. विधानसभा निवडणूक बंडखोरी केल्याने दिपाली मते यांच्या मार्गात अनेक अडथळे आहेत. त्यामुळे ऐनवेळी नाव जाहीर करण्याची राजकीय चाल वरिष्ठ नेते खेळण्याची शक्यता. नगरसेवकांची मते जाणून घेतल्यानंतर त्यावर लगेचच नावे जाहीर करण्याची शक्यता त्यामुळे कमी झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT