

Pune News: पुणे शिक्षणासाठी जगभर प्रसिध्द आहे. पण पुणेकरांनी या स्मार्ट सिटीच्या कारभाराच्या चाव्या ज्यांच्या हातात दिल्या ते 'माननीय' नगरसेवक किती शिकले आहेत, याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. निवडणुकीचा अर्ज भरताना दिलेल्या प्रतिज्ञापत्रकातून ही माहिती मिळाली आहे.
पुण्यात विविध विद्यापीठ, वैद्यकीय, अभियांत्रिकी महाविद्यालय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधन संस्था आहेत. या शैक्षणिक संस्थांतून दरवर्षी लाखो विद्यार्थी पदवी घेऊन बाहेर पडत असतात, मात्र या शिक्षणासाठी प्रसिद्ध असणाऱ्या पुण्याचा विकासासाठी निर्णय घेणारे नगरसेवक किती शिकलेले आहेत, याबाबत सध्या पुण्यात चर्चा सुरु आहे.
नगरसेवक, महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, स्थायी समिती अध्यक्ष, शहर सुधारणा, विधी समिती, महिला व बालकल्याण, शिक्षण अशा समित्यांचा समावेश महापालिकेत आहेत. या समित्यावर नगरसेवक असतात, या समित्याच्या माध्यमातून ते शहराच्या विकासासाठी महत्त्वाचे निर्णय घेतात.
नगरसेवक पालिका सभागृहात महत्त्वपूर्ण प्रकल्प राबविण्यासाठी शिफारस करीत असतात. त्यामुळे त्यांना संबधित विषयाबाबत पूर्ण ज्ञान असणे गरजेचे असते. पण निवडून आलेल्यांपैकी 7 नगरसेवक किती शिकले याची माहितीच महापालिकेच्या वेबसाईटवर उपलब्ध नाही. त्यांनी ही माहिती लपवून ठेवली आहे का? असा प्रश्न सध्या विचारण्यात येत आहे.
नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये पुण्यात भाजपकडे सत्तेच्या चाव्या आल्या आहेत. सर्वाधिक जागा भाजपला मिळाल्या आहेत.१६५ पैकी ११९ जागांवर भाजपचे उमेदवार निवडणूक आले आहेत. भाजप पहिला क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला २७, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ३, काँग्रेसचे १५ आणि शिवसेना (ठाकरे) पक्षाचा एक उमेदवार निवडून आला आहे.
महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ४१ प्रभागांतून १६५ नगरसेवक विजयी झाले.
१६५ सदस्यांपैकी ३५ टक्के म्हणजे ६१ नगरसेवकांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले आहे.
केवळ ८ टक्के सभासदांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.
सर्वसाधारण २० टक्के म्हणजे ३३ सदस्यांचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे.
२५ टक्के म्हणजे ४५ सदस्य दहावीपर्यंत शिकलेले आहेत. यात दुसरी, चौथी, आठवी, नववीपर्यंत शिक्षण घेतलेल्यांचा समावेश आहे.
दहावीपर्यंत शिकलेले ४५ नगरसेवक
बारावीपर्यंत शिकलेले ३३ नगरसेवक
5 नगरसेवकांनी पदविका मिळवली आहे.
61 जणांचे पदवीपर्यंत शिक्षण घेतले आहे.
पदव्युत्तर शिक्षण : १४
माहिती उपलब्ध नसलेले सभासद : ०७
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.