Rohit Pawar VS Ram Shinde
Rohit Pawar VS Ram Shinde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Rohit Pawar VS Ram Shinde: जामखेड राम शिंदेंना तर कर्जतमध्ये रोहित पवारांना लॉटरी लागणार का?

सरकारनामा ब्यूरो

Ahmednagar News: कर्जत-जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे आमदार राम शिंदे यांच्यात जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. कर्जत-जामखेड या दोन्ही बाजार समितीत दोन्ही गटाला समसमान नऊ-नऊ जागा मिळाल्या. त्यानंतर सभापती, उपसभापती पदावरून शिंदे-पवारांमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळाली.

अखेर जामखेड बाजार समितीच्या सभापती-उपसभापतीची निवड ईश्वर चिठ्ठीने झाली. यामध्ये सभापतीपद भाजपकडे तर उपसभापतीपद राष्ट्रवादीकडे गेले. यानंतर आज कर्जत बाजार समितीच्या दोन जागांच्या निकालाची फेरमतमोजणी झाली. मात्र, यामध्ये कोणताही फेरबदल झाला नाही.

फेरमतमोजणीत आमदार रोहित पवार आणि आमदार राम शिंदे यांच्या गटाच्या प्रत्येकी नऊ-नऊ जागा कायम राहिल्या. त्यामुळे आता कर्जत बाजार समितीचा सभापती आणि उपसभापती कुणाचा होणार? कर्जत बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतीपदाची निवडही जामखेडप्रमाणे ईश्वर चिठ्ठीने झाली तर ईश्वर चिठ्ठी कुणाला पावणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, कर्जत बाजार समितीच्या (Bazar Samiti) निवडणुकीत (Election) रोहित पवार (Rohit Pawar) आणि आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांचे समर्थक आमने सामने आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा सभापती आणि उपसभापतीपदाच्या निवडीवेळी आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

Edited By : Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT